________________
(१०) सूत्रकृतांगाच्या द्वितीय श्रुतस्कंधाचे सार
—
शकुंतला चोरडिया
सूत्रकृतांगच्या अथांग ज्ञानसागरात डुबकी मारली
सात अध्ययनातून सात विचारांची पाने उलगडली
पुण्डरीक
१) संसाररूपी पुष्करणी कषाययुक्त कर्मरूपी पाण्याने भरली कामभोगाच्या दलदलीत आर्यरूपी कमळे उमलली चार वादींची भेट झाली, पुष्करणीतील श्रेष्ठ पुण्डरीक-कमल घेण्यासाठी धडपड चालली.
अज्ञानाची कास धरली आणि एकमेकांना कमी लेखत लेखत त्यांची इच्छितापासून भटकंती झाली सिद्ध मार्ग जाणणाऱ्या साधकाने मात्र आध्यात्मिक उन्नतीच्या बळावर इष्टाची प्राप्ती केली ॥
२०२
क्रियास्थान
२) भटकंती झालेले अज्ञानी आशा, आकांक्षा, हव्यास, अत्याचार, अनाचारांच्या बारा क्रियास्थानात अडकले आणि अधर्मस्थानात रमत गेले. विवेकाचा त्याग करून निष्प्रयोजनाने हिंसा करण्यात मग्न झाले. चाळीस प्रकारच्या पापश्रुतात स्वतःला झोकत राहिले. पारिवारिक मोहाच्या पसाऱ्याने अर्थदंडात हरवले. अनर्थदंडाच्या पापाने जन्ममरणाच्या परंपरेत फिरत राहिले. तेराव्या इयापथिकी क्रियास्थानातले धर्मस्थानात जागृत झाले. आत्मार्थी, पुरुषार्थी, मोक्षार्थी बनून निवृत्तीच्या मार्गावर चालू लागले ।