________________
४) स्त्री-परिज्ञा - ब्रह्मचर्यघातक विघ्नांचे वर्णन
नरक ___ - नरकातील दुःखांचे वर्णन
वीरस्तुती महावीरांची स्तुती वर्णन ७) कुशील चारित्रहीन व्यक्तीचे वर्णन ८) वीर्य
शुभाशुभ प्रयत्नांचे वर्णन ९) धर्म
धर्माचे वर्णन १०) समाधि
धर्मातील स्थिरतेचे वर्णन ११) मार्ग
संसार-बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग १२) समवसरण क्रिया-अक्रिया-विनय-अज्ञानाचे वर्णन १३) याथातथ्य मानवी मनाचे सुंदर वर्णन १४) ग्रंथ
ज्ञानप्राप्तीच्या मार्गाचे वर्णन १५) आदानीय - महावीरांच्या उपदेशाचे सार १६) गाथा - गद्यमय असून भिक्षूचे वर्णन.
अशा प्रकारे प्रत्येक अध्ययनाचे शीर्षक जरी वेगळे असले तरी त्यात विचारांची साखळी गुंफली आहे. विषय नजरेतून सुटू नयेत म्हणून विषयांची पुनरावृत्ती फार आहे. अनेकदा व्यापक विचार मांडले आहेत. यात एक प्रकारे 'मानसशास्त्र'ही आहे. कसे वागा, कसे वागू नका याचा भरपूर विचार मांडला आहे. उत्तम श्रावकाचे उदाहरणात्मक वर्णन नाही. पण त्याच्या अंगी कोणते गुण असावेत याचे विस्तृत वर्णन आहे.
श्रुतस्कंध २ :
प्रत्येक अध्ययन वेगळे पण पूर्ण स्वतंत्र आहे. विषयांची विविधता अनेक पैलूतून मांडली आहे. सर्व विषय अर्थपूर्ण, परिणामकारक आहेत. सर्व अध्ययनात काळाच्या पुढचे विवेचन आहे.
२००