________________
एकांत नित्य-एकांत अनित्य, भवीजीव मोक्षगामी, बाकी सारे संसारी. सूक्ष्माची हिंसा किंवा त्रसांची हिंसा पाप सारखेच, उद्दिष्ट आहार करणारे साधू आधाकर्मीच, अशी अनेक प्रकारची विधाने करून अनाचाराला गाठले, वाणीचे बंधन सोडले. एकांतवादी बनून वादविवादाला पाचारण केले. आशुप्रज्ञ बुद्धिमानांनी, साधकांनी वचनगुप्ती साधून अनेकांत दृष्टीने चिंतन केले. आणि श्रुत चारित्र्यरूपी धर्माला, सद्भावाच्या सत्तेला मानले. कर्माने बांधलेल्या, कर्मातून कर्मानेच सुटका होते हे जाणून, सर्व प्राणिमात्रांवर मैत्रीभाव ठेवून गुणग्राहकतेने माध्यस्थभावाने उत्कृष्ट संयमाचे अनुष्ठान
केले ।।
आर्द्रकीय - ६) वचनगुप्ती साधलेल्या महावीरांच्या परमभक्त आर्द्रका'ने, ‘गोशालका'च्या
उपहासाने गुरूंच्या व्यापारी, डरपोक म्हणून केलेल्या टीकेला, मार्मिक उत्तर दिले. जीवात्म्याला एकांत सर्वव्यापक, नित्य मानणारे, ज्ञानानेच मुक्ती होते असे तत्त्व प्रतिपादन करणाऱ्या सांख्यांना क्रियारहित ज्ञानाने मुक्ती मिळत नाही हे पटवून दिले. दोन हजार ब्राह्मणांना भोजन करवणारे, माणसाला खळीचा पिंड, बालकाला भोपळा म्हणून शिजविणारे 'शाक्य', एका मोठ्या हत्तीची हत्या करून वर्षभर त्याचा आहार करणारे ‘हस्तितापस' कसे मिथ्याधारणेत गुंगले आणि देवगतीचे वारस होणार या भ्रमात राहिले. त्यांना आद्रर्काने समर्पक उत्तर देऊन सावद्य-क्रिया आणि उद्दिष्ट-आहाराचा त्याग करून निष्कपट भावाने उत्कृष्ट साधक कसे व्हावे, हे पटवून दिले।।
२०४