________________
हत्तीसारख्या विशालकाय, विकसित, चेतनशील प्राण्याला मारणारा, हिंसा दोषांपासून निवृत्त होऊ शकत नाही. त्यांच्या आश्रित राहणाऱ्या प्राण्यांचा तसेच मांस, रक्त, चरबी यात राहणाऱ्या, उत्पन्न होणाऱ्या अनेक त्रस-स्थावर जीवांचा घात होतो. थोड्या जीवांना मारणारे अहिंसक म्हटले तर मर्यादित हिंसा करणारे गृहस्थ तर हिंसा दोषरहित मानले जातील. गृहस्थ त्रस सोडून (गाथापतिचोर-ग्रहण-विमोक्षण-न्याय) स्थावरांची मर्यादा घेऊन, बाकीच्या स्थावरांचे प्रत्याख्यान घेऊन हिंसा दोषाचे प्रमाण कमी करतात.
सप्त कुव्यसनात पण मांस निषिद्ध मानले जाते. ५) जैन साधू तर ईर्यासमितीने युक्त, भिक्षेच्या ४२ दोषांपासून रहित, यथालाभ
संतुष्ट होऊन आहार घेतात. ६) 'सर्व जीव समान', असे म्हणून सन्नी पंचेंद्रिय मारणे म्हणजे दहा बलप्राण
मारणे होय. एकेंद्रियात चार बलप्राण आहेत. शिवाय आपण, वनस्पती शंभर पटीने वाढवू शकतो पण एक हत्ती मारला
तर एक वंशच नाश पावतो. ८) पंचेंद्रियांची हत्या करणाऱ्या नरकगामी हस्तितापसाजवळ जास्त वेळ न
घालवता आपण अहिंसा पाळणाऱ्या, मोक्षगामी भ. महावीरांच्या दर्शनाला लवकर जावे, या उद्देशाने आर्द्रकमुनी तेथून थोडक्यात उत्तर देऊन निघतात. जैन साधू तर भ्रमरवृत्तीप्रमाणे गोचरी घेतात (दशवैकालिक-दुमफप्फियाअध्ययन १) उद्दिष्ट आहार घेत नाहीत. हस्तितापसांप्रमाणे वर्षभराची तरतूद व अन्नाबद्दलची आसक्ती न ठेवता, रोजची रोज गोचरी घेतात.
२०७