________________
प्रत्याख्यानाला प्रयत्नपूर्वक आणि तीव्र आत्मशक्तीची जोड लागते. विचार करणाऱ्या मनुष्ययोनीतच ही सर्व क्षमता आहे. प्रत्याख्यान हे चेतनच घेऊ शकतात, अजीव ते घेऊ शकत नाहीत. पंचेंद्रिय मनुष्य इच्छा असल्यास बऱ्याच प्रमाणात आणि पंचेंद्रिय तिर्यंच हे अल्प प्रमाणात प्रत्याख्यान घेऊ शकतात. क्षेत्राच्या प्रभावामुळे नारकी व देवगतीतले जीव प्रत्याख्यान घेऊ शकत
नाहीत.
उपसंहार : जैन धर्मात सर्वात महत्त्वाचा सिद्धांत. महावीरांनी प्रत्याख्यान व प्रतिक्रमणाला नित्य आचारात स्थान दिले आहे. आहाराच्या मर्यादा घ्या, असा संकेत मिळाला नसून १८ पापस्थाने व
कषाय यांची जाणीव करून दिली आहे. ___ सर्व साधुआचार प्रत्याख्यानाशी जोडलेला आहे. ___ शुभसंकल्प हेच प्रत्याख्यानाचे सार होय.
प्रत्याख्यान हे फक्त आहाराचेच नसून भावशुद्धीला महत्त्व आहे. सुखासमाधानात असलेल्या व्यक्तीने, 'कुठे थांबायचे' हे ठरवावे आणि हेच प्रत्याख्यान शिकविते.
आपल्यात असलेली प्रमादता, अविवेकता नष्ट करणे आणि जागरूकता निर्माण करणे हाच प्रत्याख्यान घेण्यामागील हेतू होय.
प्रत्याख्यान घेणे, संयम पाळणे हे मोक्षप्राप्तीचे साधन होय. ____ ही १८ पापस्थाने असली तरी त्या अंत:प्रवृत्ती आहेत. मानवी स्वभावात
दडलेल्या भावभावना आहेत. त्या नाकारून चालत नाहीत. त्यांचा नाश
२१८