________________
२) आर्द्रक : गोशालकाच्या अगदी उलट की ज्याने महावीरांना अजून
प्रत्यक्ष पाहिलेही नाही. अनार्य देशातला, केवळ जातिस्मरणामुळे प्रव्रज्या धारण केलेला, महावीरांच्या दर्शनाच्या अतीव ओढीने निघालेला, परंतु तरीही रस्त्यात भेटलेल्या गोशालकाच्या प्रत्येक आक्षेपाला मार्मिकपणे खोडून काढणारा असा आर्द्रक. यावरूनच त्याचा निर्ग्रथधर्मावर दृढ विश्वास दिसून येतो. 'वणिकाची उपमा एकदेशीय कशी सत्य आहे, कारण ते सर्वांचा आत्मिक लाभ पाहून उपदेश देतात, पण सर्वथा व्यापारी नाहीत' हेही पटवून देतो. यावरून रंगूनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा' या पद्याची आठवण करून देणारे असे महावीर होते, हे आर्द्रकाच्या विवेचनातून स्पष्ट होते. आर्द्रक बुद्धिमान व वाक्पटू होता. तो बुद्धाच्या आहाराची उपहासात्मक टीका करतो तर सलगी दाखवणाऱ्या सांख्यांना झटकून टाकतो. असा हा व्यवहारी' आर्द्रक. गौतम, ४) पार्खापत्य पेढालपुत्र : हे दोघे दोन वेगवेगळ्या तीर्थंकरांच्या परंपरेतले. तरी सहज शंका विचारणारा पार्श्वनाथांच्या परंपरेतील पेढालपुत्र. त्याच्या मनात प्रत्याख्यानाविषयी गैरसमज आहे, अज्ञान आहे, अनभिज्ञता आहे. तरीही संकोच न करता पृच्छा करतो. 'गौतम' पूर्वाश्रमीचे प्रकांड पंडित तर आता भ. महावीरांचे प्रथम गणधर तरीही निरभिमानी. गौतमाने पेढालपुत्राला त्रस व त्रसभूत शब्दातील साधर्म्य दाखवून सुप्रत्याख्यानाचे दिग्दर्शन, विविध उदाहरणाद्वारे करविले. आभार न मानता, जाणाऱ्या पेढालपुत्राला आपल्या वकिली बुद्धीने, कृतज्ञता व्यक्त करण्यास भाग पाडले. पेढालपुत्रानेही आपण आधीच्या परंपरेतील असूनही आपली चूक मान्य करून, चातुर्यामधर्म सोडून, सप्रतिक्रमण पंचमहाव्रतात्मकधर्माचा
२२१