________________
१०) मांस कच्चे असो, शिजविले जात असो किंवा शिजविलेले असो, तिन्ही
अवस्थांमध्ये अनंत निगोदिया जीवांची उत्पत्ती होत असते, अशी मान्यता अनेक जैन आचार्य नोंदवितात.
खरे तर कोणत्याही अन्नात, थोड्या काळानंतर त्रसजीवांची उत्पत्ती होत असते. ज्यात त्रसजीव जास्त ते अन्न निषिद्ध आहे. मांसात निरंतर
जीवोत्पत्ती होतच असते. नुसता स्पर्श केला तरी जीवहत्या होते. ११) मनुस्मृतीसारख्या ब्राह्मणधर्मीय ग्रंथात म्हटले आहे -
अनुमन्ता विशसिता, निहन्ता क्रयविक्रयी ।
संस्कर्ता चोपहर्ता च, खादकश्चेति घातकाः ।। अर्थात्, प्राण्यांच्या वधाची आज्ञा देणारा, शरीरावर घाव करणारा, मारणारा, खरेदी करणारा, विकणारा, शिजवणारा, वाढणारा, खाणारा
ह्या सर्व आठही व्यक्ती घातक आहेत. १२) मांस खाणाऱ्याला परमधामी देव म्हणतात -
___तुहं पियाई मंसाइं खण्डाइं सोल्लगाणि य ।
खाविओ मि समंसाइं अग्गिवण्णाई णेगसो ।। उत्तराध्ययन १९.७० १३) श्रेणिक राजा देखील पंचेंद्रिय हत्येमुळे नरकात गेले - अशी जैन पौराणिक
मान्यता आहे. १४) सव्वे जीवा सुहसाया दुहपडिकूला । सव्वेसिं जीवियं पियं ।। आचारांग
या सहअस्तित्वाच्या जीवनसूत्रांचा सर्वांनीच विचार करून जो प्राकृतिक आहार आहे, सहज उपलब्ध आहे, त्याचाच स्वीकार करावा.
हस्तितापस मनाला पटत नाहीत. एकाच प्रकारचे अन्न रोजच वर्षभर खाणे हे रुचत नाही. नुसताच मांसाहार पण करतील असे वाटत नाही. संयमपथावर जाणारे निरवद्य आहारच घेतात.
२०८