________________
महापरिज्ञा
३) जन्ममरणाच्या परंपरेत अडकलेले आहारपरिज्ञेचे अभ्यासू झाले. आहाराशी संबंधित साऱ्या सावद्य क्रियेत प्रवृत्त झाले. 'जसा आहार, जशा भावना तसे गतीतील परिभ्रमण', हा कर्मसिद्धांत मात्र ते विसरले. त्रस - स्थावर एकमेकांचा आधार म्हणून मित्र झाले आणि एकमेकांना खाऊनच जीवन जगू लागले. ओजआहार, प्रक्षेपआहार, कवलआहार असे आहाराचे विभाजन केले. सबल म्हणवणाऱ्या माणसाने निर्बल अशा प्राण्यांचे प्राण घेतले. आहाराचा विवेक करणारे हिंसेपासून दूर होऊ लागले. त्याग, विरति, प्रतिज्ञा, संकल्प करून यतनावान होऊन विचरण करू लागले ।। प्रत्याख्यानक्रिया
—
आचारश्रुत
५)
-
४) कर्मसिद्धांत न जाणणाऱ्याने मानवी मनात दडलेल्या अठरा पापस्थानांच्या अंतःप्रवृत्तीचे वेळोवेळी प्रसंगाप्रसंगाला प्रदर्शन केले. त्यातून मुक्त व्हायचेच नाही म्हणून अप्रत्याख्यानी बनून पापकर्माच्या बंधनाचे जाळे विणले. जीवन जगण्याच्या मुख्य गरजा, 'अन्न, पाणी, निवाऱ्या'साठी हिंसेचे थैमान घातले. मन-वचन-कायेच्या वक्रतेने आत्म्याचे भान विसरून जन्म - म-मृत्यूच्या चक्रात गुरफटले. सदाचारी, सद्विचारी अनिच्छेने टाळता येतच नाही अशा हिंसेचे भागीदार जरी बनले, तरी पश्चात्ताप करून, क्षमाभाव धरून, प्रायश्चित्त घेऊन प्रत्याख्यानी बनले आणि उच्च गतीकडे मार्गक्रमणा करू लागले ॥
मन-वचन-कायेच्या वक्रतेने मिथ्या धारणेच्या आहारी गेले. सत्याची ओळख न झाल्याने अर्थरहित तत्त्वाने मोक्षमार्गाचे विराधक बनले. जग
२०३