________________
अधिक महत्त्व दिले आहे. आंतरिक दोषांची, दुर्गुणांची अथवा पापांची स्थाने ही अठरा आहेत. या अठरा पापस्थानांनी सदैव कर्मबंध होत असतो म्हणून प्रत्याख्यान, ‘अठरा पापस्थानां'चे करण्यास सांगितले आहे.
_ 'अठरा पापस्थान' ही शब्दावली जैन तत्त्वज्ञानात अनेकदा येते. अर्थातच अठरा पापस्थानांना प्राचीन काळापासून अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच या अध्ययनातही संपूर्ण अठरा नावे न देता ‘प्राणातिपातापासून ते मिथ्यादर्शनशल्यापर्यंत' अशी शब्दावली उपयोजित केली आहे. सर्व पापस्थानांचा त्याग करताना एक गोष्ट मात्र समान आहे, ती अशी की - हिंसा असो, असत्य वचन असो की चोरी असो, कोणतीही पापक्रिया ही मनाने, वचनाने व कायेने स्वतः करू नये, दुसऱ्यांकडून करवून घेऊ नये व अनुमोदनही देऊ नये. अठरा पापस्थानांवर एकंदरीतच दृष्टी टाकली तर असे दिसून येते की, या मानवी स्वभावात दडलेल्या वेगवेगळ्या भावना आहेत, अंत:प्रवृत्ती आहेत. प्रसंगानुसार त्या वेळोवेळी प्रकट होतात. गुणांबरोबर माणसात अवगुणही अनेक आहेत. जसे - सहज जाता जाता कोणाला दगड मारणे (हिंसा), खोटे बोलणे (असत्य), स्वत:च्या मालकीची वस्तू नसताना उचलणे (चोरी), दुराचार (कुशील), संग्रहवृत्ती (परिग्रह), क्रोध, अभिमान, कपट, लोभ, मनासारखे काही घडले की आनंदाची भावना (रति), घडले नाही तर बेचैनी (अरति), सरळ सरळ तोंडावर बोलण्याचे धाडस नसेल तर त्यांच्या अपरोक्ष निंदा (परपरिवाद), एकमेकात भांडणे लावण्याची व चुगली करण्याची वृत्ती (कलह, पैशुन्य), व्यक्ती किंवा वस्तूच्या प्रति आसक्ती (राग) किंवा घृणा (द्वेष), खोटा दोषारोप (अभ्याख्यान), 'मी त्यातला नाहीच'
असा भास निर्माण करण्यासाठी कपटपूर्वक खोटे बोलणे (मायामृषावाद) इ.इ. पण सर्वात घातक असे पापस्थान म्हणजे 'मिथ्यादर्शनशल्य'. अर्थात् चुकीच्या
१८३