________________
होता. धर्म त्याच्या हाडामासात भिनलेला होता. तो समोरच्या प्रतिवादीस देखील ‘निर्ग्रथ धर्म सत्य आहे', हे व्यवस्थितरित्या पटवून देत होता आणि त्यात स्थिर करीत होता. वीतराग भगवंतांच्या विषयी त्याची श्रद्धा त्याच्या धर्मदलालीतून आणि जिज्ञासूवृत्तीतून दिसून येते.
त्याचे यश सर्वत्र पसरलेले होते. त्याचे हृदय स्फटिकासमान निर्मल होते. राजाच्या अंत:पुरात देखील त्याला प्रतिबंध नव्हता. यावरून तो किती शुद्ध चारित्र्याचा होता हे प्रतिबिंबित होते.
सर्व सुखसोयींनी युक्त असलेली त्याची 'शेषद्रव्या' नावाची उदकशाला, याचकांसाठी सदैव उघडे असलेले त्याच्या घराचे द्वार, निर्ग्रथ श्रमणांसाठी केलेली शुद्ध आणि एषणीय अशन, पान, खाद्य आणि स्वादिमची व्यवस्था, 'लेप' श्रावकाचा दानी स्वभाव, अनुकंपाभाव, दयावृत्ती, कर्तव्यपालनता दर्शवीत आहे.
'लेप' श्रावक फक्त व्यवहारात किंवा कर्तव्यपालनात मग्न होता असे नव्हे तर तो आत्मोन्नतीत देखील रममाण होता. चतुर्दशी, अष्टमी, पौर्णिमा यासारख्या तिथींना तो परिपूर्ण पौषधव्रताचे पालन करी. इच्छांचा निरोध करून उपवास आदि तपाने तप्त होवून आत्म्यास निर्मल करीत होता. निरासक्त भावात युक्त होवून आनंदाने जीवनयापन करीत होता.
उपसंहार : अशा या आदर्श श्रावकापासून प्रत्येकाने पुढील प्रेरणा घ्याव्यात. १) मी माझ्याकडील धनसंपत्तीत अर्थात् परिग्रहात न अडकता निरासक्त भावनेने कर्तव्यपालनात तत्पर असावे.
२) लेप जर अत्यंत मोठा व्यापार कुशलतेने सांभाळून, पौषधादीव्रतांचे पालन करू शकतो तर मला देखील वेळ मिळत नाही, कोणाची साथ नाही अशी कारणे न देता यथाशक्य १२ व्रतांचे पालन करण्यास प्रेरित झाले पाहिजे.
१८९