________________
आज देखील वर्तमानात बाबा आमटे, नारायण मूर्ती, अझीझ प्रेमजी सारखी माणसे ‘लेप' सारखेच आदर्श श्रावक आहेत, नागरिक आहेत. मी देखील जैन दर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यास प्रयत्नशील राहीन. १२ व्रतांचे पालन करून पर्यावरण समतोल ठेवण्यास सहकार्य करेन.
उत्तराध्ययन, अंतगड, विपाकसूत्र यासारख्या आगमग्रंथांचा थोडाफार परिचय होता पण सूत्रकृतांगाने आमचा वैचारिक क्षेत्राचा पट उलगडला. बुद्धी विशाल झाली. समाजाचे भान आले. वाणीविवेक समजला. सर्व भारतीय दर्शनांचा मूलस्रोत सूत्रकृतांग आहे हे समजले. नवीन मुद्दे, नवीन विषय, वादसंवाद, प्रश्नोत्तर, जुन्या शब्दांचे नवीन अर्थ दिसले. दृष्टी विस्तारली. एकांगीपणाचे तोटे कळले.
१९०