________________
उपसर्गादि करतो सहन
होते कषायांचे उपशमन ।।२।।
घेतो अचित्त जलपान आणि समभावाने भोजन नाही गृहस्थ पात्रग्रहण नसे आसक्ती प्रलोभन ।।३।।
सावद्ययोग पच्चक्खाण कृत कारित अनुमोदन असे सामायिक यावत् जीवन जो करितो परिपालन त्याचे उत्तम सामायिक जाण त्याचे निश्चित देवलोक गमन ।।४।।
दोघांनाही दिले मोक्षसाधन असो तो श्रावक वा श्रमण सम्यक् सामायिकाचे उदाहरण आहे इतिहास प्रमाण ।।५।।
केले प्रत्यक्ष महावीरांनी वर्णन झाले पुणियाचे धन्य जीवन आणि धन्य महावीर दर्शन ।।६।।
१२३