________________
रगडून, जमिनीत टाकायचो तर कोथिंबीर सहजी येत होती. पण आता ते दिवस संपले. प्रगत शास्त्रज्ञ सर्व प्रयोग बियांवर करण्यात व्यस्त आहेत. प्रगत जात तयार करण्यासाठी, आकार वाढविण्यासाठी व प्रमाण वाढविण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा व औषधांचा वापर चालू आहे. हा बदल झपाट्याने होत चालला आहे. प्रयोगाद्वारे अशी काही बी-बियाणे बनवितात की त्यांच्याकडून विकत घेण्याशिवाय पर्यायच उरत नाही.
नैसर्गिक पद्धतीचा लय होऊन कृत्रिमता आली आहे. टिश्यूकल्चरने तयार केलेली झाडेही प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने वाढवितात. एखादी बारीकशी पेशी लावून, तापमान नियंत्रित करून, संरक्षित अशा अवस्थेत त्यांना ठेवावे लागते. जशी आपली नाजूक मुले हवामानातील बदल सहन करू शकत नाहीत, अगदी तशीच ही कलमी झाडे सुद्धा नाजूक असतात. ऊन, वारा, पाऊस त्यांना सहन होत नाही. ते अल्पायुषी असतात.
आता तिसरे सहस्रक उजाडले आहे. विज्ञानाचे वारे जोरजोरात सर्व क्षेत्रात वहात आहेत. नवनवीन प्रयोगांनी प्रवेश केला आहे. 'घरच्या घरी' ही संकल्पना भूतकाळात गेली आहे. आधुनिक संशोधनाचे दुष्परिणाम वनस्पतिसृष्टीवरही झाले आहेत. जेनेटिक् इंजिनिअर नवनवीन संशोधन करत आहेत. परंतु शेतकरी समाजाचे शोषण होत चालले आहे. शेती ही संपूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस वेळेवर आला नाही तर पाणी नाही. पाणी घालायचे म्हटले तर वीज नाही. कृत्रिमरीतीने तयार केलेल्या वनस्पती लवकर किडतात म्हणून त्यांच्यासाठी जंतुनाशके विकत आणावी लागतात. खतांचा वापर करून जमिनी उजाड होत चालल्या आहेत. जर १७९