________________
त्या वनस्पतींकडे पाहिले असावे. दुसरा दृष्टिकोण असा असावा की, त्या काळी तापसवर्ग जंगलात रहात होता व कंदमुळे खाऊनच त्यांचा जीवननिर्वाह होत होता. अतिरिक्त वापरामुळेही त्या प्रजाती नष्ट न होण्याच्या दृष्टीने, त्यांच्या वापराचा निषेध केला असावा. म्हणजेच 'कंदमुळे अनंतकायिक वनस्पती आहेत म्हणून त्या खाऊ नयेत' या दृष्टिकोनाबरोबरच भ. महावीरांच्या अनेकांतवादी दृष्टिकोनामुळे, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे, विचार करण्याचे अनेक पैलू, विविध आयाम आपल्याला सहजी उपलब्ध झाले आहेत.
वनस्पतियोनिक वनस्पती अथवा अध्यारोह वनस्पती यांचा आताच्या परिप्रेक्ष्यात आपण वेगळा अर्थ लावू शकतो. जसे बांडगूळ - एखाद्या झाडाच्या मोठ्या खोडात खळगा तयार होऊन त्यात सूक्ष्म बीजे पडतात. जसे वडाच्या झाडात पिंपळाची आलेली फांदी अथवा पिंपळाच्या झाडात वडाची आलेली फांदी. अशा प्रकारे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या अशा वनस्पतींना पाहूनच बागकाम शास्त्रज्ञांनी कलमी वनस्पती विकसित केल्या असाव्यात. सजातीय वनस्पती अथवा समान गुणधर्म असलेल्या वनस्पती घेऊन, जेनेटिक संयोग घडवून 'कलम'पद्धती निर्माण केली. परंतु दुष्परिणाम असा आहे की कलमी वनस्पती या परत फांदी लावून येत नाहीत. लावलेच तर झाड येईल, अफाट वेगाने वाढेलही पण पुन्हा फुले, फळे इ. काहीही येणार नाहीत.
आचारांग, सूत्रकृतांग, दशवैकालिक इ. जैनग्रंथात वनस्पतींचे अग्रबीज (जसे अग्रभागी येणाऱ्या कणसातून तयार होणारी धान्ये), मूलबीज (मूळ हेच ज्यांचे बीज अर्थात् सर्व प्रकारची कंदमुळे), पर्वबीज (पेरवाल्या
१७७