________________
वनस्पती जसे ऊस इ.), स्कंधबीज (फांदी लावून येणाऱ्या वनस्पती) अशाही प्रकारे वर्गीकरण केलेले दिसते. अग्रबीजात गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका इ. सर्व प्रकारच्या धान्यांचा समावेश होतो. झाडावर पिकून, पूर्णवाढ होऊन, खाली पडणाऱ्या अवस्थेत त्यांची तोडणी होते. परिपक्व अवस्थेत तयार झालेले असल्यामुळे जैन व जैनेतर, ह्यांचा मुख्य अन्न म्हणून स्वीकार करतात. तरीही 'प्रत्येकात जीव आहे', हे गृहीत तथ्य तसेच कायम राहते.
एकंदरीत काय, काहींचे बी लावून, काहींचे खोड लावून, काहींच्या फांद्या लावून तर काहींची मुळे लावून जैनशास्त्रात वर्णिल्याप्रमाणे आजही प्रत्यक्षात, अशा विविध मार्गांनी झाडांची प्रतिरूपे तयार केली जातात.
शेतीविषयक सद्यपरिस्थिती अशी आहे की ‘बी.टी.बियाणे' हा बाजारात येणारा अतिशय भयंकर प्रकार आहे. ते बी आणून लावले तर एकदाच उगवते. त्यापासून तयार झालेले बी पुन्हा लावले तर झाडे येतील पण फुले, फळे येणार नाहीत. त्या बीमध्ये एवढेच जिन्स् ठेवलेले असतात की त्यापासून एकदाच उत्पादन होऊ शकेल. अलीकडच्या १०-१५ वर्षात याची झापाट्याने वाढ होत आहे. व्यापारी वर्गाची मक्तेदारी झाली
आहे. पूर्वी शेतकरी स्वत:चे एक पोते, बी-बियाणे म्हणून, पुढील पेरणीसाठी जपून ठेवायचे, ते सर्व आता संपुष्टात आले आहे. तुमचे तुम्हाला उत्पन्नच करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परावलंबन वाढत चालले आहे.
'गावरान बी' पुन्हा पेरणी केल्यानंतर उगवत होते पण ते आकाराने लहान व प्रमाणही कमी होते. जसे आपण घरच्या घरी धने घेऊन, थोडे
१७८