________________
पाऊस वेळेवर आला नाही तर एक पीक वाया जाते. बाजारात जाऊन पुन्हा महागडी बियाणे आणावी लागतात. ठीक आहे, बी एकवेळ विकत आणू पण पाण्याचे काय ? पाण्याच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. पण एक थेंबही शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. अशा चक्रव्यूहात शेतकरी अडकले आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करणे सोडल्यामुळे शेतकरी आत्महत्येपर्यंत पोहोचले आहेत. त्यातून सुटकेचा मार्ग नाही. अन्नदात्या शेतकऱ्याची ही भीषण व दयनीय अवस्था आहे. वनस्पतींच्या संशोधनाचे झालेले हे दुष्परिणाम आहेत. खाद्य संस्कृतीत शिरलेले हे विज्ञान, उपयोग तर दूरच पण नुकसान मात्र अधिकाधिक होत आहे.
जैन दर्शनात बारा भावनांपैकी ' अशरणभावना' अनेक प्रकारे व्यक्त केली जाते. आधुनिक युगातील अशरणतेचा हा एक नवा प्रकार आला आहे. अन्नदात्या शेतकऱ्याला व अन्न खाणाऱ्या अशा दोघांनाही एकेकाळी ते सुखावह होत होते. त्यातील सर्व सत्ये कळून सुद्धा नाइलाजाने खावे लागत आहे. माझ्या हातात ते सुधारण्याचा काहीही उपाय नाही. ही ती नवी 'असहायता' किंवा 'अशरणता'.
१८०