________________
प्रत्येक माणसाचा स्वभाव जसा भिन्न-भिन्न असतो, तसा प्रत्येक झाडाचा स्वभावही वेगवेगळा असतो. जातीनुसार प्रत्येक झाडाचे वेगळेपण तर असतेच पण त्यातही एका झाडाचे एक फूल, त्याच झाडाच्या दुसऱ्या फुलाप्रमाणे नसते. वंशसातत्य टिकवून ठेवण्यासाठी जशी माणसे धडपड करत असतात, वेगवेगळ्या प्रगत विज्ञानाचा आश्रय घेतात, तश्या वनस्पतीसुद्धा हे सर्व निसर्गत: करत असतात. केळीच्या झाडाच्या बाबतीत केळ्यांचा घड एकदा का येऊन गेला की पुन:पुन्हा येत नाही. पण त्याच झाडाला ‘आपली प्रजाती टिकवून ठेवणे' या स्वयंप्रेरणेने, खालून नवीन कोंब फुटल्यावरच आधीचे झाड हळूहळू संपते व नवीन वाढीस लागते.
वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने वेलींनीसुद्धा कोट्यवधी वर्षात आपल्यात अनेक बदल केले आहेत. स्वसंरक्षणासाठी व स्वअस्तित्वासाठी अनेक बाह्यपरिवर्तने केली आहेत. जैन दृष्टीने या बदलांना पर्यायबदल असे म्हणता येईल.
'बटाटा, रताळे इ. वनस्पती जमिनीखाली का येतात ?' याची चर्चा वनस्पतिशास्त्राच्या जाणकारांशी केली असता, त्यांचे म्हणणे पुढीलप्रमाणे आले. ते म्हणतात की, बटाट्यासारख्या कंदांना आपले वंशसातत्य टिकवून ठेवण्यासाठी, त्यामध्ये असलेला अधिक अन्नाचा साठा कित्येक दिवस जमिनीखाली तसाच सुरक्षित ठेवता येतो. त्यांनी स्वत:साठी तयार केलेले अन्न जमिनीखाली सुरक्षित राहते आणि म्हणूनच त्यांनी स्वत:साठी बनविलेले अन्न आपण घेऊ नये, घेतल्यास ती चोरी होईल, अशाही एका वेगळ्या निरीक्षणशक्तीच्या आधारे भ. महावीरांनी
१७६