________________
(२) सूत्रकृतांगात निर्दिष्ट ‘पापश्रुत' अर्थात् मंत्र, तंत्र, अद्भुतविद्या
व्याख्यान : डॉ. सौ. नलिनी जोशी
शब्दांकन : डॉ. सौ. अनीता बोथरा ‘इन्स्टंट'चे युग आहे. विचार-विनिमय करायला वेळ नाही. सबुरी नाही. स्वत:वर विश्वास नाही. अधिक पुरुषार्थही करायचा नाही. येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीशी ठामपणे लढा देण्याचे मनोबलही नाही. परिणामस्वरूप माणूस कोणाच्या ना कोणाच्या आहारी जातो व आपले आयुष्य कीर्तिसंपन्न, आरोग्यसंपन्न, धनसंपन्न व बुद्धिसंपन्न बनविण्याचे ‘इन्स्टंट' उपाय शोधतो.
__ जसे - आजारी पडलो तर 'छू मंतर' केल्याप्रमाणे, कोणा एकाचा मंत्र, अंगारा, धूपारा मिळाला की त्वरित तंदुरुस्त होण्याची आशा ; गरिबी दूर करण्यासाठी कोणा एका बुवाकडे जातो, आणि तो म्हणतो - थांब रे बाबा ! तुझ्यावर कोणीतरी चांगलीच करणी केली आहे, तर मी तुला उपाय देतो ; कितीही प्रयत्न करून धंद्यात यशच मिळत नसेल तर दुसऱ्यांवरती जादू-टोण्याचा आरोप व तो दूर करण्यासाठी पळापळ ; मूलबाळ होत नसेल तर देवाला साकडं घालणे व नवस मागणे ; गाय, बैल इ. प्राणी खरेदी करायचे असतील तर त्यांच्या शरीराच्या लक्षणावरून व चिह्नांवरून त्यांना तपासून घेणे, हे आणि असे अनेक उपाय आपण आयुष्यात सुखी होण्यासाठी करत असतो व हेच आजच्या समाजाचे वास्तव चित्र आहे. ___ त्याचेच पडसाद दूरदर्शनवरही आपल्याला दिसून येतात. बुरी नजरों से बचने के लिए, घर-दुकान-कारखानों के वास्तुदोष समाप्त करने के लिए, परीक्षा में अच्छे गुण प्राप्त हो इसलिए, नोकरी तथा संतान की उन्नति के लिए, विवाह में आये विघ्न दूर होने के लिए, पत्रिका में रहे दोषों को दूर करने के लिए,
१६०