________________
स्वास्थ्य में आनेवाले संकटों को दूर करने के लिए, दुर्घटना का योग टल जाय इसलिए, आदि आदि सभी संकटों को भगाने के तथा सौभाग्य के रास्ते खोजने
I
के उपाय हमारे पास हैं । तो आओ ! - महालक्ष्मी यंत्र, शिव-हनुमान महायोग यंत्र, नवग्रह यंत्र, नजरसुरक्षा कवच, कालचक्र, राशिभविष्य इ. द्वारा आपके जीवन में आये सभी विघ्न तुरंत टल जायेंगे ।
अशा प्रकारे सतत, विनाव्यत्यय दूरदर्शनवर जाहिरातींचा भडिमार होत असतो. आपणही कोणत्या ना कोणत्या संकटात अडकलेलोच असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक तंत्र, मंत्र, विद्या आणि चमत्कारांनी आपलंही डोकं भांबावून जाते. ऐहिक सुखासाठी आपणही आकर्षित होऊन त्याच्या आहारी जातो व त्याचा आश्रय घेतो.
सूत्रकृतांगातील ‘क्रियास्थान' अध्ययनात अशा प्रकारच्या विद्यांना 'पापश्रुत' म्हटले आहे. तेथे ‘पापश्रुत' कशाकशाला म्हणावे याची बरीच मोठी यादी दिली आहे. जसे स्त्री-पुरुष, पशु-पक्षी यांची शुभाशुभ लक्षणे सांगणारे शास्त्र; अष्टमहानिमित्तशास्त्र; ग्रह-नक्षत्र - तारे यांचे शास्त्र ; भूशास्त्र; शकुनशास्त्र; मोहिनीविद्या; तत्काळ अनर्थ करणारी विद्या; रोग निर्माण व रोग दूर करण्याचे शास्त्र; भूतबाधा करण्याचे शास्त्र; धूळ, केस, मांस, रक्त इ.च्या वृष्टीचे फळ सांगणारे शास्त्र म्हणजेच 'काळ्या जादू'चे शास्त्र; शाबरी, द्राविडी, गांधारी इ. भौगोलिक प्रदेशाच्या नावावर आधारित, प्रदेशानुसारी विद्या; अदृश्य होण्याची विद्या. या आणि यासारख्या अनेक विद्या व शास्त्रांचे विवेचन तेथे दिले आहे. हा त्याकाळच्या समाजाचा जणू आरसाच आहे.
ज्याअर्थी अशा अनेक विद्यांचे व शास्त्रांचे वर्णन तेथे आले आहे
१६१
—