________________
करणे हे त्यांच्या गावीच नाही. परिणामी जागरूक रहाण्याऐवजी नकारात्मक दृष्टीच वाढीस लागली.
आचारांगासारख्या अर्धमागधी आगमात दर क्षणाला सजीवसृष्टीकडे पाहण्यास सांगितले आहे. संवेदनशील राहण्यास सांगितले आहे. आजूबाजूच्या निसर्गातील पृथ्वी, अप्, तेज, वायू, वनस्पती इ. एकेंद्रिय जीवच नव्हे तर संपूर्ण जीवांच्या प्राणिरक्षेविषयी जागरूक व अप्रमत्त राहण्याचा संदेश दिला आहे. जर आपण त्यांच्याकडे सारखे पापात्मक दृष्टीने पाहू तर त्यांच्या जवळ जाणे, त्यांचे आपल्या मुलाबाळांप्रमाणे संगोपन करणे, त्यांच्यावर प्रेम करणे, या भावना कशा वाढीस लागतील ? ___ वनस्पतींना इजा होईल, त्यांना दुखापत होईल म्हणून आपला वापर तर थांबत नाही ना ? जपा म्हणजे काय ? कमी वापरा म्हणजे काय ? अपरिग्रहाचा खरा अर्थ काय ? - जर आपण उपयोग करतो तर अशाप्रकारचे कातडी बचावू' धोरण काय कामाचे ? उलट वंशसातत्य टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक मनुष्याने वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन आपल्या मुलाबाळांप्रमाणे केलेच पाहिजे.
प्रत्येक जैनाचे कर्तव्य आहे की - आपल्या घरासमोर एक छोटीशी का होईना ‘बाग' असावी ज्यामुळे आपल्या घरातील सर्व ओला कचरा मातीत टाकून त्याचे खत निर्माण होईल. (ही जैनदृष्टीने ‘परिष्ठापना समिति' आहे.) पाण्यालाही अप्कायिक जीव मानणाऱ्या जैनांनी, निसर्गतः पावसाच्या रूपाने मिळणारे पाणी "rainwater harvesting" च्या रूपाने उपयोगात आणले पाहिजे.
१७०