________________
* जैन परंपरेतील आकर ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'दृष्टिवाद' या
ग्रंथातच अशा अनेक विद्यांचा समावेश होता. चमत्कारी विद्या इतर परंपरेत आहेत तर जैन परंपरेतही आहेत, हे दाखविण्यासाठी. समाजात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी. राजदरबारात आपला प्रभाव पाडण्यासाठी.
सामाजिक दबावामुळे आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. ____ अनिष्ट दूर करण्यासाठी.
प्रसंगी जनहितासाठी. धर्मप्रभावनेसाठी. काहीही असो, कारण कोणतेही असो, या विद्यांचा वापर आम समाजात चालूच होता. पापश्रुतातील या विद्या समाजात अस्तित्वात होत्या. प्रत्यक्ष प्रसारात होत्या, प्रचलित होत्या, त्यांचा अभ्यास होत होता व प्रत्यक्ष उपयोगही चालू होता. पण तरीही जैन आगमात त्या शिकायला व त्याचा
प्रत्यक्ष वापर करायला विरोध आहे आणि म्हणूनच - * दृष्टिवाद' नावाच्या अंग आगमात अनेक प्रकारच्या विद्या, त्याचे प्रत्यक्ष
प्रयोग, त्याचे विधिविधान, ते सिद्ध करण्याची पद्धती इ.चे ज्ञान होते व
त्यामुळेच त्याचा लोप झाला असावा किंवा केला असावा. * ज्या आचार्यांनी अशा विद्यांचा वापर केला त्यांचे नाव 'नंदीसूत्रा'तील
स्थविरावलीमध्ये नसून ‘प्रभावक आचार्य' म्हणून त्यांना नोंदविले आहे. ‘अति तेथे माती' या उक्तीनुसार एकदा का या विद्यांचा वापर सुरू झाला की त्याचा अतिरेक व्हायला वेळ लागत नाही. म्हणून पापश्रुत विद्यांचा वापर करू नये असे निर्देश दिलेले दिसतात.
१६४