________________
मते होती तीनशे त्रेसष्ठ केले चारांतच विभाजन क्रिया, अक्रिया, विनय, अज्ञान करून मतमतांचे समालोचन ।।५।।
स्वमताचे केले निरूपण असे होते दिव्य समवसरण ठेवले सूत्रकृतांगाने जपून धन्य महावीर मतिमान ।।६।।
(ब) ब्रह्मचर्य-गुरुकुलवास ब्रह्मचर्य गुरुकुलवासाचे संबोधन ब्रह्मचर्याचे अर्थ होती तीन चारित्र, गुरुकुलवास व विरत मैथुन कळले सूत्रकृतांगातून ।।१।।
एक आदर्श शिक्षणव्यवस्थापन 'दीक्षा', शिक्षा असे गुरुकुलवास दोन दीक्षा गुरुकुलवास आजीवन
आदर्श गुरू शिष्याची करतो जडण घडण ।।२।। ग्रंथ ते निग्रंथ मार्गक्रमण आवश्यक ब्रह्मचर्यपालन ज्ञानप्राप्ति गुरुकुलवासाचे प्रयोजन ब्रह्मचर्याशिवाय अशक्य ज्ञानाराधन ।।३।।
१२१