________________
(१२) सूत्रकृतांगातील तीन शब्दांचे मूळ अर्थ
__ - चंदा समदडिया
(अ) समवसरण
जम्बूस्वामींनी केले प्रश्न कसे होते महावीर भगवान कसे त्यांचे ज्ञान, दर्शन कसे संयम, तप आणि ध्यान ।।१।।
केले सुधर्मा स्वामींनी वर्णन ज्यांनी पाहिले महावीर जवळून प्रत्यक्ष गुणांचे हे महावीर स्तवन झाल्या उपमाही अजरामर ।।२।।
अशा महावीरांना वंदन करून वीरत्थुईने मंगलाचरण गेलो पहावया समवसरण आणि पहातो तो काय ? तेथे तर वेगळेच दृश्य ।।३।।
अहो नव्हत्या सोन्या चांदीच्या भिंती नव्हते सोन्याचे परकोट, नव्हते महाप्रातिहार्य
वैभव किंवा स्फटिकाचे सिंहासन होते विद्वानांचे संमेलन एक सुरेख वादसंगम ।।४।।
१२०