________________
देण्याचा प्रयत्न केला. हिंसेच्या जगात भ. महावीरांनी प्रकाशाचा झोत टाकून, समाजापासून ते वैयक्तिक मनातल्या द्वंद्वापर्यंत दर्शन करविले. आपण आपल्या कल्पनाशक्तीनेही जितक्या हिंसक विषयांना स्पर्श करू शकलो नसतो त्याहून अधिक-सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, आर्थिक, धार्मिक, वैयक्तिक अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचे, त्या काळी भ. महावीरांनी आपल्या उपदेशाच्या माध्यमातून, क्रियास्थानांच्या रूपाने, प्रत्यक्ष स्वरूपच आपल्यासमोर वर्णिले.
हिंसेमागील प्रेरणा, त्यासाठी केली गेलेली प्रवृत्ती व त्याचे होत असलेले परिणाम अशा तीन मुद्यांना स्पर्श करणारा उपदेश त्यांनी दिला. अभ्यासातून असे लक्षात आले की त्यावेळचे गुन्हे आणि आत्ता होत असलेले गुन्हे, यात काही मोठा फरक नाही. वैयक्तिक दृष्ट्या माणूस निराशेत जाऊन कशी आत्महत्या करतो इथपासून ते थेट समाजात राहून नाती - परिवारासाठी इतरांचीही कशी पिळवणूक करतो येथपर्यंत - अशा सर्व प्रकारच्या विचारांनी भरलेली ही क्रियास्थाने आहेत. दूरदर्शनवर सुद्धा जितकी विषयांची विविधता नसेल तितकी विविधता भ. महावीरांनी क्रियास्थानांच्या द्वारे निदर्शनास आणून दिली आहे. स्वत:च अधिक सुखात असावे, मी सर्वांवर सत्ता चालवावी, माझ्या कामवासनेची पूर्ती व्हावी, खूप पैसे मिळवावेत ही त्या सर्व क्रियास्थानांमागची प्रेरणा आहे व त्यासाठी अवलंबिलेले खालील वेगवेगळे हिंसक मार्ग आहेत.
*
पारिवारिक कुशलतेसाठी, नाती-गोती- परिवार - मित्रमंडळी यांच्या भल्यासाठी, भरभराटीसाठी, देवीदेवतांसाठी - अनेक प्रकारच्या जीवांची हिंसा म्हणजे 'अर्थदंड' व परिणामस्वरूप पापकर्मांचा बंध.
स्वत:साठी व दुसऱ्यासाठी, कोणतेही प्रयोजन नसताना विनाकारण म्हणजे ना ही शरीरासाठी, ना ही उपजीविका म्हणून, ना ही पुत्र - पत्नी१५२