________________
भावना योगानेच समस्त कर्मांचा, अंत येतो साधता, अनुकूल वाऱ्याच्या संयोगाने नावेलाही, सहजपणे तीर येतो गाठता ।।
पूर्वसंचित कर्मांचा क्षय, आणि नवीन कर्मांचे नाही बंधन, अशा मेधावी लोकांना, पुन्हा नाही जन्म आणि मरण ।।
सिद्धस्वरूप अस्तित्वाला, कधीच धोका नाही संभवत, आजही अखंडपणे वाहत आहे, त्यांची ज्ञानधारा अविरत ।।
असे द्रष्टा लोकच होतात, कामवासनेचे पारगामी, सूक्ष्म जाळे ओलांडून जाणाऱ्या वाऱ्यापेक्षा, कोणती बरे उपमा द्यावी !
अनाविल, छिन्नस्रोत दमनशील साधु, अन्नामध्ये गृद्ध नसतो, म्हणून तर तो मोक्षाशी, संधान जोडू शकतो ।।