________________
(४) आदानीय अध्ययन
- आशा कांकरिया त्रायिन् , त्रिकालविद् , तिन्नं आणि तारयाणं, हे तर घाती कर्मांचा क्षय करणाऱ्या, अरिहंतांचे विशेषण ।।
चित्त विप्लुतीच्याही पलिकडले, असे आहे ज्यांचे केवलज्ञान, अनुभूत सिद्ध अनुपम तत्त्वांचे,
करतात जे आख्यान ।। सत्याने संपन्न, यथार्थ अशा, ज्ञानाचे होते प्रकटीकरण, अध्यात्म व आत्ममयता, हेच त्याचे खरे कारण ।।
इथे तिथे कुठेही भेटणार नाहीत असे महान उदाहरण, म्हणून तर त्यांचे,
करायलाच हवे अनुसरण ।। सर्व भूतमात्रांशी मैत्रीभावना, हा तर ऋषींचा धर्म, या जीवित भावनेतच, दडले आहे सत्य (मैत्री) धर्माचे मर्म ।।