________________
मन-वचन-कायेचा योग, ज्याला साधता येतो, तोच ज्ञानाराधनेमुळे सर्वांचा, चक्षुष्मान ठरतो ।।
प्रतिपूर्ण धर्माची प्ररूपणा, व आचरणानेच होतात कर्मांचे अकर्ता, अशा वीतरागी महापुरुषांना, पुन्हा कसली हो जन्मकथा ।।
पंडितवीर्याने युक्त असे पुरुष, 'महावीर'च असतात, पूर्वसंचित कर्मक्षयाने,
शुद्ध आत्मस्वरूप प्राप्त करतात ।।
एकाहून एक सुंदर, उपादेय, विचारांची आहे यात गुंफण, काव्यालंकाराने युक्त यमकबद्ध, असे हे आदानीय अध्ययन ।।
१००