________________
श्रमण मिथ्या क्रियाकांडात अडकतो. संसारसागरातून पार होण्याऐवजी
संसारातच डुबतो. भगवंत म्हणतात -
हे साधका ! पाच समितींचे पालन कर. तीन गुप्तींचे रक्षण कर. सर्व पदार्थांची आसक्ती सोडून करीत असलेल्या क्रियाकांडाचा विचार कर. ज्ञान, दर्शन, चारित्राचा आराधक होऊन ग्रहण केलेल्या संयमात सम्यक्प्रकारे प्रवृत्ती कर आणि पुरुषार्थाने कर्मबंधनाचे पाश तोडून सिद्धश्रीची माळा धारण कर.
९७