________________
(३) वादविवाद - संगम : एक समीक्षा
- शकुंतला चोरडिया
स्वसमय-परसमय या जीवनाच्या दोन मुख्य सिद्धांतांवर सूत्रकृतांगाची रचना झाली. लोकांची मती, नीती, प्रवृत्ती बघून भगवंतांनी तत्त्वांची विखुरणी केली. विचारांच्या झऱ्यात प्रवाहित होऊन चिंतनाच्या खळखळाटाने मनाची दारे उघडली. समवसरणाच्या नव्या अर्थाची गवसणी झाली आणि ३६३ पाखंडींची मते नोंदविली गेली. वादविवाद सभा रंगत गेली. वेगवेगळ्या वादींचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. वादविवाद संगमाच्या सभेची समालोचना करून यथार्थाची मात्र दृष्टी मिळाली.
इहलोक, परलोक कोणी पाहिले, प्राप्त वर्तमान स्थितीत मनसोक्त रमले, पुण्य-पाप, शुभ-अशुभ, सदाचार- दुराचाराच्या व्याख्याच विसरले, पंचमहाभूतांनी वेष्टित अशी चेतना गेल्यावर, आत्माराम मातीतच विरले, अशी भ्रांती ठेवणारे बृहस्पतीमतानुयायी चार्वाक अज्ञानवादीत गणले गेले.
एकाच आत्म्याने भिन्न-भिन्न रूप धारण केले,
मती सुधारली त्याने पुण्य केले, मती बिघडली त्याने पाप केले, सुख-दु:खाचे मूल्यमापन तुमच्या कर्तृत्वावर गेले,
केवळ आत्मा हेच अंतिम सत्य मानले आणि पुद्गलांना गौण केले, आत्मद्वैतवादी एकात्मवादी ठरले.
पंच महाभूतांचा समुदाय म्हणजे शरीर त्यात आत्म्याचे अवतरण झाले, प्रत्येक शरीराचा आत्मा वेगळा, म्हणून ज्ञान अज्ञानाचे गट झाले,
९४