Book Title: Tiloy Pannati Part 1
Author(s): Vrushabhacharya, A N Upadhye, Hiralal Jain
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
श्री जिनधर्मपरायण ब्र. जीवराज गौतमचंद दोशी यांच्या धर्मपत्नी जिनधर्मवत्सला सौ. रतनबाई यांस त्यांच्या अनेक सद्गुणावर लुब्ध होऊन हें सम्मान पत्र आदरानें अर्पण करीत आहोत.
[३५] सम्मान पत्र
वसंततिलका वृत्त
अर्हन्तशास्त्र गुरु ह्रींच अपूर्व रत्नें । तूं ठेविशी स्वहृदयांत सखे प्रयत्नें । तेणेंचि नाम तत्र सार्थक रत्नबाई | आहे समस्त सुजनां नित सौख्यदायी । १ आहे तुझा मुनिपदावर पूर्ण भाव । तूं मानितेस भवसागरं त्यास नाव । श्रीशांतिसागर मुनीन्द्रपदद्वयास । तूं हेतु मानिसि सखे सुखसाधनास | २ जी स्त्री असे पतिमना अनुकूलवृत्ति । तेथेंच धर्मसुख कीर्ति रमा प्रवृत्ति । हे सर्व सद्गुण तुझ्या असती मनांत । झालीस धन्य सखये महिलागणांत । ३ आचार्यचारुचरणा विनयें नमून । तूं घेतलीस दुसरी प्रतिमा म्हणून | चंद्रासमान यश निर्मल वाढलें गे । तूं धर्म आचरि पतीसह सानुरागें । ४ जेथें महापुरुष वास करीत होते । स्थानास त्या म्हणति तीर्थ सुतत्ववेत्ते । तीर्थवंदन तुवां बहु आदरानें । केलेस पुण्य तुजला मिळलें तयानें । ५ जे नेत्ररोग परिपीडित लोक त्यांचा । तो रोग दूर करण्यास मनांत साचा उद्देश तूं धरुनि आर्द्र अशा मनानें । नेत्रौषधी सदन बांधविलें धनानें । ६ या पूज्य पर्वतीं जिन मंदिरास । बांधून गे पति तुझा सखये बुधास । झाला जसा परमआदरणीय तैशी । झालीस तूंहि महिलागण सद्धितैषी । ७ लामो पतीसह सखे ! तुजला प्रभूत । आयुष्य मानधन सौख्य यश प्रशस्त । ठेवो तुम्हां उभयतांस सुखी सदैव । तो श्रीजिनेश परिवारजना सदैव । ८
1
श्रीमज्जिनेन्द्र गुरु आगम पूजनांत । राहें तुझें प्रतिदिनीं अनुरक्त चित्त । पाहून जैन महिलागण अर्पितो ग । सम्मान पत्र तुजला स्वकरांत तें घे । ९
गजपंथ क्षेत्र,
विक्रम संवत् १९९४ महावीर संवत् २४६४ मार्गशीर्ष शुद्ध ९
Jain Education International
तुझा
गुणानुरक्त जैन महिला समाज
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org