________________
क्रोधाचा प्रतिघोष नाही विसरत मुले; बापाहून वरचढ क्रोधी होतात मुले !
घरोघरी प्राकृतिक शेत होते सत्युगात; निरनिराळ्या फुलांच्या बागा आहेत कलियुगात !
माळी बनाल तर बाग सुंदर शोभेल; नाहीतर बिघडून कषायात डूबेल !
करु नये कधी मुलींवर शंका; नाहीतर ऐका बरबादीचा घंटा !
वारसाहक्कात मुलांना देणार केवढे; तुम्हाला मिळाले वडीलांकडून तेवढे!
जास्त द्याल तर करेल उधळपट्टी; दारूड्या बनून काढेल तुझी खरडपट्टी!
कराल मुलांवर राग जितके; बदल्यात होईल द्वेष तितके !
राग-द्वेषातून सुटण्यासाठी हो तु वीतराग; भवपार होण्याचा बस हाच एक मार्ग!
मोक्ष हेतु, मुल नाहीत ते महापुण्यशाली ! घर नाही खाली पण वहीखाते आहे खाली.
कोणत्या जन्मात नव्हती अपत्ये ? आता तरी आवर, हो मुमुक्षु सच्चे.
आई-वडील मुलांचे संबंध आहे संसारी; वारसाहक्काचे दिले नाही तर कोर्टात तक्रारी !
रागावले दोन तास तर तूटेल असा हा संबंध; समजून जा आता हे तर स्मशानापूरते संबंध !
असत नाही कधी दृष्टीने सगळी मुले समान; राग-द्वेषाच्या बंधनामुळे फरक पडतो देण्या-घेण्यात !
12