Book Title: Aai Vadil Aani Mulancha Vyavhar
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 84
________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : असे का ? आता तू ज्या जंतूला मारलेस, तसाच एक बनवून मला देऊ शकतोस ? एक लाख रूपये बक्षीस देणार. जर एक जीव बनवून दाखवलास तर लाख रूपये बक्षीस देणार. तू बनवू शकशील ? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : तर मग आपण कसे मारू शकतो ? तेव्हा ह्या जगात कोणी एक तरी जीव बनवू शकतो का ? काय हे शास्त्रज्ञ बनवू शकतील? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : तर मग जे बनवू शकत नाही, त्याला आपण मारूही शकत नाही. ही खुर्ची बनवु शकतो, ह्या सर्व वस्तू बनवु शकतो, तर त्यांना नष्ट करू शकतो. तुझ्या लक्षात आले ? प्रश्नकर्ता : होय. दादाश्री : आता काय करणार ? प्रश्नकर्ता : कोणाला नाही मारणार. दादाश्री : त्या जंतूला मरण्याची भिती वाटते खरी? आम्ही मारायला गेलो तर तो पळून जातो का ? प्रश्नकर्ता : होय. दादाश्री : तर मग कसे मारू शकतो ? आणि ह्या गहू, बाजरीला भिती नाही वाटत, त्यास हरकत नाही, काय ? गहू, बाजरी दूधी हे सगळे दूर पळतात का ? आपण सुरी घेऊन गेलो तर दूधी दूर पळते का ? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : तर मग त्याची भाजी बनवून खाऊ शकतो. तुला मरण्याची भीती वाटते की नाही ?

Loading...

Page Navigation
1 ... 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101