________________
मुलांचा आई-वडीलांप्रति व्यवहार
(उतरार्ध)
१६. 'टीनेजर्स' (तरुणपिढी) सोबत 'दादाश्री'
प्रश्नकर्ता : आदर्श विद्यार्थ्याच्या जीवनात कोण-कोणत्या लक्षणांची आवश्यकता आहे ?
दादाश्री : विद्यार्थ्याला त्याच्या घरात जेवढ्या व्यक्ति असतील, त्या सर्वांना खूष ठेवण्याची आवश्यकता आहे आणि तसेच स्कूलमध्ये पण ज्या माणसांसोबत असेल, आपले जे टीचर (शिक्षक) असतील, त्या सर्वांना खूष ठेवण्याची आवश्यकता आहे. आपण जेथे जेथे जातो तेथे सर्वांना खूष ठेवायला हवे आणि आपल्या अभ्यासाकडे पण लक्ष द्यायला हवे.
दादाश्री : तू कधी जीव-जंतु मारले आहेस ? प्रश्नकर्ता : होय, दादाजी. दादाश्री : कुठे कुठे मारले होते ? प्रश्नकर्ता : बागेत, वाड्याच्या मागे. दादाश्री : कोणते जीव-जंतु होते ? कोक्रोच (झुरळ) वगैरे होते ? प्रश्नकर्ता : सर्वांना मारलेले आहे. दादाश्री : मनुष्याच्या बाळाला पण मारून टाकतो का? प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : बाळाला नाही मारू शकत ? कोणाचे बाळ असेल तर त्याला मारू नाही शकत ?