________________
७०
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : भीती वाटते. दादाश्री : हो, तर तसेच त्याला सुद्धा भीती वाटत असते.
अनहक्काचा खड्डा तर खूपच खोल ! त्यामधून पुन्हा वर येऊच शकत नाही. म्हणून दक्षतेने चालणे चांगले. म्हणून तू सावध हो. आता तर तुझी युवा अवस्था आहे, जे वृद्ध होणारे असतील, त्यांना आम्ही काही सांगत नाही. हे भय-सिग्नल तुला दाखवित आहोत.
प्रश्नकर्ता : होय, होय, घेऊन जाणार नाही, दुसऱ्याच्या पत्नीला घेऊन जाणार नाही.
दादाश्री : हो, बरोबर आहे. घेऊन जाण्याचा विचार सुद्धा करायचा नाही. एखाद्या स्त्रीप्रति आकर्षण झाले तरी सुद्धा, 'हे दादा भगवान ! मला क्षमा करा' असे म्हणायचे.
मुलांसाठी आई-वडीलांनी काय करावे ? तर मुले बाहेर कुठे मान शोधणार नाहीत असे वागायला हवे. ते जर मानाचे भुकेले नसतील तर बाहेर मानाच्या हॉटेलमध्ये मान खायला जाणार नाहीत. त्यासाठी काय करायचे ? तर तो घरी आल्यावर त्याला असे बोलायचे, 'बाळ, तू तर खूप शहाणा आहेस, असा आहेस, तसा आहेस,' त्याला थोडा सन्मान द्यायचा, अर्थात् त्याच्याशी मैत्रीभाव ठेवायला हवा. त्याच्या सोबत बसून, त्याच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवून आपण म्हणायचे, 'बाळ चल, आपण जेवायला बसूया, आपण एकत्र नाष्टा करूया' असे सर्व व्हायला हवे. तर मग तो बाहेर प्रेम शोधणार नाही. आम्ही तर पाच वर्षाचा मुलगा असेल तर त्याच्यासोबत पण प्रेमाने वागतो. त्याच्यासोबत फ्रेन्डशिप (मैत्री) करतो.
प्रश्नकर्ता : पप्पा अथवा मम्मी माझ्यावर रागावलेत तेव्हा काय करायचे ?
दादाश्री : 'जयसच्चिदानंद' बोलायचे, 'सच्चिदानंद, सच्चिदानंद, सच्चिदानंद जयसच्चिदानंद' बोलायचे. असे बोलतात ना, तर ते शांत होऊन जातील.
पप्पा, मम्मीच्या बरोबर भांडण करायला लागलेत तेव्हा सर्व मुलांनी