________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : आपण सांगितले की मुला मुलींनी एकमेकांशी मैत्री करु
नये.
दादाश्री : नाही, अजिबात करायला नको.
प्रश्नकर्ता : अजिबात करायला नको असे सांगितले त्या मुळे ह्यांना संतोष झाला नाही.
दादाश्री : ही फ्रेन्डशिप शेवटी पोईझन बनेल, शेवटी पोईझनच होईल, मुलीला जीव देण्याची वेळ येते, मुलाचे काही जात नाही. म्हणून मुलांसोबत उभे देखिल राहू नये. मुलांच्या सोबत फ्रेन्डशिप करुच नये. कारण ते पोईझन आहे. लाख रूपये दिले तरी फ्रेन्डशिप करु नये. कारण शेवटी विष खाऊन मरावे लागते. किती तरी मुली विष खाऊन मरतात.
___म्हणून वय झाल्यावर आपण घरात आई-वडीलांना सांगून टाकायचे की, एखाद्या चांगला मुलगा पाहून माझे संबंध जोडून द्या, पुन्हा संबंध तुटणार नाहीत अशा ठिकाणी जुळवून द्या. माझ्या लग्नासाठी आता मुलगा शोधा. दादा भगवानांनी मला सांगितले आहे की तु तसे आई-वडीलांना सांग. तर असे त्यांना सांगावे. त्यात लाजायचे नाही. तेव्हा मग त्यांना कळेल की आता मुलीची खुशी आहे, तर लग्न करुन देऊ. आधी समोरासमोर पसंती करुन लग्न जुळवायचे नंतर दोन वर्षानी लग्न करायचे एकदा लग्न ठरल्यावर कोणी आपल्याकडे तसे पाहणार नाही. म्हणेल की हिचे तर ठरले आहे.
ही मैत्री चांगली नाही, लोक तर दगा-फटका करणारे असतात. मैत्रीणींसोबत मैत्री करु शकते, पण पुरूषासोबत मैत्री करायची नाही. धोका देऊन निघून जातात सर्व. कोणी विश्वास करण्यायोग्य नाही, सगळे धोकेबाज, एकसुद्धा खरा नाही आहे. बाहेर कोणाचा विश्वास ठेऊ नका.
लग्न करुन घेतलेले चांगले, असे इकडे-तिकडे भटकत राहण्यात हाती काहीही येणार नाही. तुझे आई-वडील लग्न बंधनात आहेत, तर आहे का काही भानगड? असे तुला सुद्धा लग्न बंधनात बांधून घ्यायला आवडेल की नाही? खुट्याला बांधून (लग्नबेडीत अडकून) घ्यायला तुला आवडत नाही? मुक्त रहायला आवडते?