________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
८३
प्रश्नकर्ता : आमच्या हिन्दु फेमिलीत सांगतात, 'मुलगी परक्याच्या घरी निघून जाईल आणि मुलगा कमाई करुन पोसणारा आहे, आम्हाला सांभाळणारा आहे.' (सहारा होणार) अशाप्रकारच्या अपेक्षा, असा दृष्टीकोन ठेवून कुटुंबातील लोक मुलींवर प्रेम ठेवत नाहीत, तर हे काय ठीक आहे?
दादाश्री : प्रेम नाही ठेवत, अशी तक्रार करणारी स्वत:च चुकीची ठरते, ही तक्रारच चुकीची आहे. हीच अज्ञानता आहे! प्रेम ठेवत नाही असे कुठलेही आई-वडील नसतातच. हीच तर समज तिला नाही, तर मग काय होईल? प्रेम नाही ठेवत असे म्हटल्यावर आई-वडीलांना किती दुःख होईल की, जर तुझ्याशी प्रेम नाही ठेवायचे होते तर मग लहानपणापासून तुझे पालण-पोषण केले ते कशासाठी?
प्रश्नकर्ता : तर मग मला असे का वाटते की आई-वडील मला प्रेम नाही करत? माझी दृष्टी अशी का झाली?
दादाश्री : नाही, सगळे असेच प्रश्न उभे करतात, काय करायचे त्याचे? लहान असती तर दमदाटी करुन गप्प बसवले असते, पण आता तू मोठी झाली, तेव्हा करणार तरी काय?
आता आमच्या लक्षात आले, की तिला ही जी अक्कल आली आहे, बाहेरून बुद्धि मिळाली आहे ना ती विपरीत बुद्धि आहे. म्हणून ती स्वतः पण दुःखी होते आणि दुसऱ्यांना पण दुःखी करते.
प्रश्नकर्ता : होय, आजकाल मुलीसुद्धा लवकर लग्न करायला तयार नसतात!
दादाश्री : मुली लवकर लग्न करायला तयार नसतात. परंतु होत असेल तर लवकर लग्न झालेले बरे. इकडे शिक्षण पूर्ण झाले आणि तिकडे लग्न होऊन गेले, असे झाले तर उत्तम. दोन्हीही एकाच वेळी व्हावेत. किंवा लग्नानंतर एखाद वर्षात शिक्षण पूर्ण होत असेल तरी हरकत नाही. परंतु लग्नबंधन होऊन जायला हवे, तर 'लाइफ' (जीवन) चांगले जाईल, अन्यथा नंतर लाइफ खूप दुःखदायी होते.
फ्रेन्ड वर मोह म्हणजे मैत्रिणीची गोष्ट करतेस की मित्राची?