________________
८२
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
परंतु खाण्याच्यावेळी काय करायला हवे ? त्यावर कंट्रोल ठेवाचला हवा की भाई, तुला एवढेच मिळेल. मग तो हळू-हळू एन्जोय करत करत खातो. पण तुम्ही तर जास्त सुट देता ना त्यामुळे एन्जोय करता येत नाही. म्हणून मग दुसरीकडे एन्जोयमेन्ट शोधतात. अर्थात् प्रथम खाण्यात कंट्रोल करायला हवा की पुरे, आता एवढेच मिळेल, जास्त मिळणार नाही.
प्रश्नकर्ता : आम्ही आमच्या मुला-मुलींना अशा पार्टीत जाऊ द्यायचे का? अशा पार्टीज्ला वर्षातून किती वेळा जाऊ द्यायचे?
दादाश्री : असे आहे ना मुलींना त्यांच्या आई-वडीलांच्या सांगण्यानुसार वागायला हवे. आपल्या अनुभवी लोकांचा शोध आहे की मुलींना नेहमी त्यांच्या आई-वडीलांच्या सांगण्यानुसार वागायला हवे. लग्नानंतर पतीच्या सांगण्यानुसार वागायला हवे. पण आपल्या मर्जीनुसार वागयला नको. असे आपल्या अनुभवींचे सांगणे आहे.
प्रश्नकर्ता : मुलांनी आई-वडीलांच्या सांगण्यानुसार वागायला हवे की नाही?
दादाश्री : मुलांनी पण आई-वडीलांच्या सांगण्यानुसार वागायला हवे, परंतु मुलांना थोडीशी ढील दिली तरी चालते! कारण मुलांना रात्री बारा वाजता जायला सांगितले तर एकटा जाईल, त्यास हरकत नाही, परंतु तुला रात्री बारा वाजता एकटीला जायला सांगितले तर एकटी जाणार का?
प्रश्नकर्ता : नाही जाऊ शकणार, भिती वाटते.
दादाश्री : आणि मुलगा असेल तर हरकत नाही, म्हणून मुलांना सवलत जास्त असायला हवी आणि मुलींना सवलत कमी द्यायला हवी, कारण तू रात्री बारा वाजता जाऊ शकत नाही.
अर्थात् हे तुमच्या भविष्याच्या सुखासाठी सांगतात. भविष्याच्या सुखासाठी मुलींना मनाई करतात. तुम्ही जर आताच या सर्व भानगडीत पडलात तर तुम्ही तुमचे भविष्य बिघडवून टाकाल. तुमच्या भविष्यातील सुख नाहीसे होईल. तुमचे भविष्य बिघडू नये याकरिता ते तुम्हाला सांगत असतात की, 'बिवेर, बिवेर, बिवेर (सावधान, सावधान, सावधान).'