________________
८४
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : नाही, दोघांची. दादाश्री : मित्र सुद्धा! तो सुद्धा मिशीवाला! प्रश्नकर्ता : होय. दोन्ही.
दादाश्री : ठीक आहे. तर त्याच्याशी आपण समभावाने रहायचे. त्यावेळी तुझी जागृति रहायला हवी. त्यावेळी भान हरवायला नको. ज्यांना ब्रह्मचर्य पाळायचे आहे, ज्यांना मोक्ष हवा आहे, त्या स्त्रियांनी पुरुषांचा परिचय कमीत कमी ठेवला पाहिजे, ते सुद्धा अनिवार्य परिस्थीतीतच. ज्यांना मोक्षात जायचे आहे, त्यानी एवढे सांभाळायला हवे. असे तुला वाटते की नाही वाटत ? तुला काय वाटते?
प्रश्नकर्ता : होय, सांभाळायला हवे. दादाश्री : की मग सध्या मोक्षाला जायचे नाही? चालेल का तसे? प्रश्नकर्ता : नाही, मोक्षाला तर जायचे आहे.
दादाश्री : तर मग पुरूषांसोबत मैत्री ठेऊन काय करायचे आहे? हा तर सर्व उष्टवलेला माल आहे. स्त्रियांसोबत फिरायचे, खायचे-प्यायचे, निवांतपणे मजा करायची, परंतु पुरूषांसोबत नाही.
प्रश्नकर्ता : दादाजी, एक मुलगी विचारते की आपले मुलांच्या सोबत फक्त 'फ्रेन्डली रिलेशन' (मैत्री संबंध) असेल, तरी सुद्धा आईवडील शंका का करतात?
दादाश्री : नाही, मुलांसोबत 'फ्रेन्डली रिलेशन' ठेऊच नये. मुलांसोबत 'फ्रेन्डली रिलेशन' हा गुन्हा आहे.
प्रश्नकर्ता : यात काय गुन्हा आहे ?
दादाश्री : पेट्रोल आणि अग्नि दोन्ही सोबत ठेऊ शकत नाही ना ? ते दोघे (मुलगा आणि मुलगी) संधी शोधत असतात. ती असे विचार करते की, केव्हा माझ्या तावडीत सापडतो आणि तो सुद्धा तसाच विचार करतो की केव्हा माझ्या तावडीत सापडते? दोघेही शिकाराच्या शोधातच असतात, म्हणून दोघेही शिकारीच म्हणायचे!