________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
८१
टीप्पणी करण्यासाठी फणा काढून टपलेले असतात. तू पण सासूला म्हणते, 'सासूबाई, तुमचे मी काय करु ? मला तर फक्त पती हवा होता ?' त्यावर सासू म्हणते, 'नाही पती एकटा थोडीच असतो, हे लष्कर तर येणारच सोबत. लष्कर सहित!
लग्न करण्यास हरकत नाही. लग्न करा परंतु समजून लग्न करा की, 'असेच निघणार आहे.' असे समजून मग लग्न करा. लग्न केल्याशिवाय सुटका नाहीच. काही मुली अशी भावना करुन आलेल्या असतात की, 'मला दीक्षा घ्यायची आहे किंवा मला ब्रह्मचर्य पाळायचे आहे' ती वेगळी गोष्ट आहे. परंतु बाकीच्यांना तर लग्न केल्याशिवाय सुटकाच नाही. म्हणून अगोदरच नक्की करुन मग लग्न करायचे की असे होणारच आहे तर मग काही भानगडच उरणार नाही, नंतर मग आश्चर्य ही वाटणार नाही. म्हणून आधी असे नक्की करुन मगच बस्तान मांडा. आणि जर सुखच आहे असेच मानून लग्न केले तर मग नंतर उपाधिच वाटेल! विवाह हा तर दुःखाचा सागर आहे. सासूच्या घरात प्रवेश करणे ही काही सोपी गोष्ट आहे? आता नवरा एकटाच असेल असे तर क्वचितच घडेल की जर त्याच्या आईवडीलांचे निधन झालेले असेल तरच.
सिविलाइज्ड (संस्कारी) लोक भांडत नसतात. रात्री दोघे झोपून जातात, भांडण नाही करत. जे अन्-सिविलाइज्ड (असंस्कारी) आहेत ना, ते भांडण करतात, क्लेश करतात.
प्रश्नकर्ता : आता आम्ही अमेरिकन मुलांच्या सोबत पार्टीत जात नाही. कारण की त्या पार्टीत खाणे-पिणे (मांसाहार-दारू) सर्वच असते. म्हणून आम्ही त्या लोकांच्या पार्टीत जात नाही, पण इंडियन मुले जेव्हा पार्टी ठेवतात तेव्हा आम्ही जातो आणि त्यात आमचे सर्वांचे मम्मी-पप्पा एकमेकांना ओळखत असतात.
दादाश्री : परंतु त्यात फायदा काय होतो. प्रश्नकर्ता : एन्जोयमेन्ट, मजा येते ! दादाश्री : एन्जोयमेन्ट !! खाण्यात तर खूप एन्जोयमेन्ट होत असते,