________________
८०
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
जर लोकांनी मला सांगितले की, दादा तुम्हाला सुट आहे, तुम्ही ह्या मुलाला जे काही बोलायचे असेल ते बोला. तो मुलगा पण म्हणाला की तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते तुम्ही मला सांगू शकता, तर मी म्हणेल, मेल्या! ती काय म्हैस आहे की तुला अशाप्रकारे पाहतो आहेस. म्हशीला चारी बाजूने पहावे लागते, ह्या मुलीला पण?
___ मग ह्याचा बदला स्त्रिया केव्हा घेतात हे माहित आहे का? ही अशी थट्टा-मस्करी केली त्याचा परिणाम मुलांना काय मिळेल नंतर?
ही तर स्त्रियांची संख्या जास्त आहे, म्हणून बिचारीची किंमत कमी झाली आहे. निसर्गच असे करवतो. आता ह्याचे रिएक्शन केव्हा येईल ? बदला केव्हा मिळतो ? जेव्हा स्त्रियांची संख्या कमी होते आणि पुरुषांची संख्या वाढते. तेव्हा स्त्रिया काय करतात? स्वयंवर! अर्थात् ती एकुलती एक लग्नवधू आणि हे एकशे वीस पुरूष. स्वयंवरात सगळे फेटा-बीटा बांधून ऐटीत येतात आणि मिशांना असे पीळ देत असतात! तिची वाट पहात असतात की केव्हा मला वरमाळा घालणार! ती पहात पहात येते, हा समजतो मला वरमाळा घालेल, अशी मान पण पुढे करतो पण ती दाद सुद्धा देत नाही ना! मग जेव्हा तिचे हृदय आतून कोणी एकाशी एकाकार होते, आकर्षित होते, त्यालाच ती वरमाळा घालते. मग भले तो मिशींना पीळ देत असेल किंवा नसेल! तेव्हा मग (बाकीच्यांची) थट्टा-मस्करी होते. बाकीचे सगळे मूर्ख बनतात आणि असे तसे करुन निघून जातात मग. तर ही अशाप्रकारे थट्टा-मस्करी झाली होती, अशाप्रकारे बदला मिळतो मग!
आजकाल तर अगदी सौदाबाजी होऊन गेली आहे, सौदाबाजी! प्रेम कुठे राहिले, सौदाबाजीच होऊन गेली! तराजूत एकीकडे रूपये ठेवा आणि दुसरीकडे आमचा मुलगा, तरच लग्न होईल असे म्हणतात. एका तराजूत रूपये ठेवावे लागतात. तराजूच्या तोलावर मोजून मापून घेतात.
१८. पती ची निवड परवशता, निव्वळ परवशता! जेथे पहावे तेथे परवशता! वडील नेहमीसाठी मुलीस आपल्या घरी ठेवत नाही. म्हणतात, 'ती तिच्या सासरीच शोभते' परंतु सासरी तर सगळे फक्त तिचे दोष काढण्यासाठी, तिची टीका