________________
७८
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
अर्थात् आई जातीवान असायला हवी आणि वडील कुळवान हवेत. मग त्यांची अपत्य खूपच उच्च प्रतीची असतात. जातीत विपरीत गुण नसतील आणि वडीलांमध्ये कुळवान प्रजेचे गुण असतील. कुळाच्या थाटामुळे मग ते दुसऱ्यांसाठी झिजतात. लोकांसाठी खपतात. खूपच उच्च कुळवान कोण? दोन्ही बाजूने नुकसान सहन करतात, घेण्याच्यावेळी सुद्धा आणि देण्याच्यावेळी सुद्धा. नाहीतर जगातील कुळवान कोणत्या प्रकारचे असतात? एका बाजूनेच नुकसान सहन करतात. जसे घेताना संपूर्ण घेतात परंतु देताना मात्र जरा जास्तच देतात. तोळाभर जास्तच देतात. लोक चाळीस तोळा देतात, पण हा स्वत: एक्केचाळीस तोळा देतो. त्याही पुढे डबल कुळवान कोणास म्हणणार ? स्वतःसाठी एकोणचाळीस (३९) तोळा घेतात, अर्थात् एक तोळा कमीच घेतात आणि देतांना समोरून एक तोळा जास्तीचा देतात, अशा लोकांना डबल कुळवान म्हणतात. दोन्ही बाजूकडून झिजतात (नुकसान सहन करतात) तर ते कमी का घेतात? कारण समोरचा आधीच स्वत:च्या दु:खाने दुःखी आहे, त्यामुळे जावू देतात! त्याचे दुःख दूर करण्यासाठी! याबाजूने संवेदनशीलपणे (भावनेपोटी) वागतात आणि दुसऱ्या बाजूनेही संवेदनशीलपणे वागतात. अशा माणसांना पहातो तेव्हा मी काय म्हणतो माहित आहे ? हे द्वापारयुगी (द्वापारयुगातील माणसे) आलेत.
जर आता उच्च कुळ मिळाले असेल आणि कुळाचा अहंकार केला, तर दुसऱ्यावेळी त्याला खालच्या दर्जाचे कुळ मिळते आणि नम्रता ठेवली तर उच्च कुळात जन्म घेतो. ही आपलीच शिकवण आहे, आपलीच पेरणी आहे. असे गुण आपल्याला प्राप्त करावे लागत नाही, सहजच प्राप्त होतात. उच्च कुळात जन्म झाल्यावर आपल्याला जन्मापासून सर्व प्रकारचे चांगले संस्कार प्राप्त होतात.
हे सर्व व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या ज्ञानाच्या गोष्टी नाहीत. तरीपण व्यवहारात तर त्या हव्यात ना!
प्रश्नकर्ता : दादाजी, आपण सांगितलेले बरोबर आहे, पण ज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहचण्या आधि तर आम्ही व्यवहारातच आहोत. तर व्यवहारात सुद्धा ज्ञानाच्या ह्या सर्व गोष्टी उपयोगी पडणारच ना?