________________
७६
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : नाही, नाही.
दादाश्री : आणि ती अमेरिकन तर 'यू यू' करुन अशी बंदूक दाखवत निघून जाते आणि ही तर संपूर्ण जीवन आपल्या सोबतच रहाते. म्हणून आम्ही तुला समजावतो की भाई, असे करू नकोस, त्याबाजूला वळलास तर पश्चाताप होईल. ही इंडियन तर शेवटपर्यंत सोबतच रहाते, हो.... रात्री भांडण केले तरी सकाळपर्यंत रिपेअर (दुरुस्त) होऊन जाते.
प्रश्नकर्ता : गोष्ट खरी आहे.
दादाश्री : म्हणून आता नक्की करुन टाक की मला भारतीय मुलीशी विवाह करायचा आहे. इंडियनमध्ये तुला जी पसंत असेल ती, ब्राह्मण, वाणी जी तुला चांगली वाटेल, त्यास हरकत नाही.
प्रश्नकर्ता : आपल्या जातीतच लग्न करण्यात काय फायदा आहे, हे जरा सांगा.
दादाश्री : आपल्या कॉम्युनिटीची (जातीची) पत्नी असेल तर आपल्या स्वभावाशी जुळणारी असेल. आपण खायला कंसार घेतले असेल आणि आपल्या लोकांना तर त्यावर तूप जास्त हवे असते. परंतु जर आपण दुसऱ्या जातीच्या मुलीला लग्न करुन आणले असेल, तर ती जास्त तूप वाढणार नाही, असे तुपाचे भांडे खाली वाकवून तूप वाढण्यात तिचे हात दुखतील. अर्थात् तिच्या भिन्न स्वभावशी दिवसभर संघर्ष करावा लागेल. पण जर आपल्या जातीची असेल तर तिच्यासोबत असे काही घडणार नाही. समजले ना ? आणि ती भाषा बोलेल ना, ती भाषा सुद्धा सफाईदार बोलेल आणि आपले दोष काढत बसेल की तुम्हाला चांगले बोलता येत नाही. तिच्या तुलनेत आपली (भारतीय स्त्री) चांगली की, काही बोलणार तर नाही, आणि आपल्याला सुनावणार पण नाही.
प्रश्नकर्ता : आपण सांगता की, आपल्या जातीची असेल तेथे भांडण होत नाही, परंतु आपल्या जातीची असेल, तेथे सुद्धा भांडणे होतातच, त्याचे कारण काय ?
दादाश्री : भांडणे तर होतात पण त्याचे समाधान सुद्धा होत असते.