________________
आई - वडील आणि मुलांचा व्यवहार
दादाश्री : नाही, टेम्पररी (तात्पूरते) लव मॅरेज असेल तर ते पाप मानले जाईल. परमनेन्ट (कायमसाठी) लव मॅरेज असेल तर ते पाप म्हटले जाणार नाही. अर्थात् ते लाईफ लाँग (जीवनभर) लव मॅरेज असेल तर त्याची हरकत नाही. टेम्पररी लव मॅरेज अर्थात् एक-दोन वर्षापुरतेच लग्न करतात. लग्न करायचे तर एका बरोबरच लग्न करायचे. स्वत:च्या पत्नीशिवाय दुसऱ्या कोणाहीसोबत जास्त फ्रेन्डशिप ठेऊ नका नाहीतर नरकात जावे लागेल.
७४
सुरूवातीलाच जर वडील म्हणालेत की, 'हे लफडे कशाला सुरू केले ?' त्यावर मुलगा उलट-सुलट बोलू लागला. तेव्हा मग त्याचे वडील समजून गेले की, 'त्याचा त्याला स्वतःलाच अनुभव घेऊ द्यावा ! आमचा अनुभव स्विकारायला तयार नाही. तेव्हा मग त्याला स्वत:लाच अनुभव घेऊ देऊया!' नंतर जेव्हा तो तिला दुसऱ्याच्या सोबत सिनेमा पाहताना बघेल ना ! तेव्हा अनुभव होईल! मग पश्चाताप करेल की वडील सांगत होते, ती गोष्ट बरोबर होती. हा तर लफडाच आहे.
प्रश्नकर्ता : मोह आणि प्रेममधील भेदरेषा काय आहे ?
दादाश्री : हा जो पतंग आहे ना ते दिव्यावर सारखी झडप मारतो आणि स्वतः : ची आहुती देतो ना ? तो स्वतःचे जीवन संपवून टाकतो. यास 'मोह' म्हणतात. पण प्रेम नेहमी टिकून असते, तसे तर त्यातही थोड्या आसक्तिचे दुःख असते. पण तरीही ते प्रेम टिकाऊ असते म्हणून ते मोह नाही.
येथे (चेहऱ्यावर) बारा महिन्यांपासून फोड आला असेल ना, तर तोंड सुद्धा बघत नाही आणि, मोह सुटून जातो. जर खरे प्रेम असेल तर एकच काय, पण दोन फोड असते तरी सुद्धा प्रेम कमी झाले नसते. म्हणून असे खरे प्रेम शोधून काढा. अन्यथा लग्नच करू नका. नाहीतर फसाल. नंतर जेव्हा ती तोंड फुगवून बसेल तेव्हा म्हणाल, 'मला हिचे तोंड पहायला आवडत नाही.' अरे, पण तु जेव्हा तिला पहायला गेला होता तेव्हा तर तोंड आवडले होते, म्हणून तर पसंत पडली होती आणि आता ही पसंत नाही. हे तर गोडगोड बोलत असेल तर आवडेल आणि कटू बोलत असेल तर म्हणेल, ‘मला तुझ्यासोबत रहायला आवडतच नाही !'