________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
७३
प्रश्नकर्ता : नाही दादाजी, स्टेशन आल्यावर.
दादाश्री : हा... स्टेशनला आपली गरज आहे आणि आपल्याला स्टेशनची गरज! ‘आम्हाला' एकट्यालाच स्टेशनची गरज आहे असे नाही. स्टेशनला सुद्धा आपली गरज आहे, हो की नाही ?
प्रश्नकर्ता : आपल्या संघात जोडली जाणारी कुमार- कुमारिका लग्न करायचे नाही असे म्हणतात, तेव्हा आपण त्यांना खाजगीत काय उपदेश देता ?
दादाश्री : मी खाजगीत त्यांना लग्न करा असे सांगत असतो. की भाई, तुम्ही जर लग्न केले तर थोड्या-फार मुली कमी होतील आणि त्यांचा निवाडा होईल. तुम्ही लग्न करुन आलात तरी पण माझी काही हरकत नाही. हा आमचा मोक्ष मार्ग विवाहितांसाठीच आहे. मी तर त्यांना सांगतो की लग्न कराल तर मुली कमी होतील आणि येथे लग्न केल्यामुळे मोक्ष अटकेल असे काही आहे!
परंतु त्यांनी काय शोधून काढले की लग्न केल्याने खूप भानगडी उभ्या राहतात. ते सांगतात, 'की आम्ही आमच्या आई - वडीलांचे सुख (!) पाहिले आहे. म्हणून असे सुख ( !) आम्हाला आवडत नाही.' म्हणजे स्वत:च्या आई-वडीलांच्या सुखाचे दाखले देतात. आजकाल आईवडीलांची भांडणे मुले घरात पहातातच आणि त्यामुळे ते कंटाळलेले
असतात.
मुलावर दबाव घालू नका. नाहीतर तुमच्या माथी येईल की माझ्या वडीलांनी बिघडवले. त्याला निभावता येत नसल्यामुळे त्याचे बिघडत असते पण आळ मात्र तुमच्यावर येईल.
त्यांना बोलवून सांगा, ‘आम्हाला मुलगी पसंत आहे, आता तुला जर मुलगी पसंत असेल तर सांग आणि पसंत नसेल तर आपण आता रद्द करूया.' तेव्हा जर मुलगा म्हणाला, 'मला पसंत नाही.' तर ते स्थळ सोडून द्या. मुलाची स्विकृती अवश्य करा, नाहीतर मुलगा पण विरूद्ध होईल.
प्रश्नकर्ता : लव मॅरेज (प्रेम विवाह) पाप गणले जाते ?