________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
७७
तिच्यासोबत दिवसभर चांगले वाटते आणि दुसरी (विजातीय)च्या सोबत चांगले वाटत नाही. एखादा तास चांगले वाटते आणि मग कंटाळा येतो. ती आली की संताप होतो, कंटाळा येतो. आपल्या जातीची असेल तर आवडेल, नाहीतर आवडतच नाही. हे सर्व जे पस्तावलेले आहेत, त्यांची उदाहरणे देऊन सांगतो आहे. हे सर्व खूप फसले गेले होते. खूपच वाईट प्रकारे फसले गेले होते.
आता तर आंतरजातीय विवाह करण्यास हरकत नाही आहे, पूर्वीच्या काळात थोडा त्रास होता.
प्रश्नकर्ता : आपल्या हातात कुठे आहे ? आपल्या हातात तर नाही आहे ना, अमेरिकन पत्नी येईल की नाही ते ?
दादाश्री : हातात नाही, तरी देखिल अशी डोळेझाक करुन थोडी चालणार आहे ? तुम्हाला सांगावे तर लागेल ना, 'ऐक बेटा! तू त्या अमेरिकन मुलीसोबत फिरू नकोस ! ते आपले काम नाही.' असे-तसे वर वर ओरडायचे तर त्याचा परिणाम होईल. नाहीतर त्याला असेच वाटत राहिल की हिच्यासोबत फिरतो तसेच तिच्यासोबत पण फिरायचे. म्हणून त्याला सांगायला काय हरकत आहे ? आणि परिसर जर वाईट असेल ना, वाईट परिसर इंडियामध्ये असतात ना, तर तेथे बोर्ड लावतात, 'बिअवेर ऑफ थीव्स्',(चोरांपासून सावध रहा.) असे बोर्ड का लावतात? तर ज्यांना सावध व्हायचे आहे ते सावध होऊन जातात. असे शब्द उपयोगी पडतात की नाही? काय, समजले की नाही तुला?
वडीलांच्या पक्षाला कुळ म्हणतात आणि आईच्या पक्षाला जाती म्हणतात. जाती आणि कुळाचे मिश्रण झाल्यावर संस्कार घडतात. फक्त जाती आहे आणि कुळ नसेल तरी संस्कार घडत नाही. फक्त कुळ आहे आणि जाती नसेल तरीही संस्कार घडत नाहीत. जाती आणि कुळ या दोन्हींचे मिश्रण एक्झेक्टनेस (यथार्थपणे) असेल तरच संस्कारी मनुष्य जन्मतात.
जाती आणि कुळ हे दोन्ही पक्ष चांगले जुळून आले तरच लग्नाच्या बोलणीसाढी पुढे जायचे, या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीत पुढे जाण्यास योग्य
नाही.