________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
दादाश्री : हो, उपयोगी पडतात ना! व्यवहार पण चांगला चालतो. 'ज्ञानीपुरूषाची' विशेषता असते. 'ज्ञानीपुरूषाजवळ' बोधकला आणि ज्ञानकला दोन्हीही असतात. बोधकला आंतरिक सुझने उत्पन्न झाली आहे आणि ज्ञानकला ज्ञानाने उत्पन्न झाली आहे म्हणून तेथे (ज्ञानीपुरूषांजवळ) आपले निरसन होतो. कधीतरी अशी बातचीत करायला काय हरकत आहे ? त्यात आपला काय नुकसान आहे? 'दादा' पण बसलेले असतात, त्यांची काही फी नसते. फी असेल तर हरकत होईल.
प्रश्नकर्ता : युवक आणि युवतींनी लग्न करण्यापूर्वी स्त्री किंवा पुरूष यांची निवड कशाप्रकारे करावी ? आणि काय करावे? काय पहावे? गुण कशाप्रकारे पहावे?
दादाश्री : ते जास्त पहाण्याची आवश्यकता नाही. युवक-युवतींनी पहायला जावे आणि जर आकर्षण झाले नाही तर बंद ठेवायचे. दुसऱ्या गोष्टी पहाण्याची आवश्यकता नाही. आकर्षण होते की नाही, एवढेच पहायचे.
प्रश्नकर्ता : कोणत्या प्रकारचे आकर्षण?
दादाश्री : ह्या डोळ्यांचे आकर्षण होते, आतून आकर्षण होते. बाजारात तुम्हाला काही वस्तू खरेदी करायची असेल, तेव्हा त्या वस्तूचे आकर्षण झाले नाही तर तुम्ही खरेदी करू शकत नाही. अर्थात् तिचा हिशोब असेल तरच आकर्षण होते. निसर्गाचा हिशोब असल्याशिवाय कोणताच विवाह होऊ शकत नाही. अर्थात् आकर्षण व्हायला हवे.
केवढी मोठी थट्टा! हा थट्टा-मस्करी करण्याचा काळ आहे, म्हणून स्त्रियांची मस्करी होत आहे. मुलगी पहायला जातो, तेव्हा मुलगा सांगतो... असे फिर, तसे फिर. इतकी थट्टा!
आजकाल तर मुले मुलींना पसंत करण्यापूर्वी बरीच काही चिकित्सा करुन निवड करतात. 'खूप उंच आहे, खूप ठेंगणी आहे, खूप जाड आहे, खूप बारीक आहे, थोडी काळी आहे' एक मुलगा असे बोलत होता, तर मी त्याला खडसावले. मी त्याला विचारले, 'तुझी आई पण वधू झाली होती. कोणत्या प्रकारचा माणूस आहे तू ?' स्त्रीचा असा घोर अपमान!