________________
७२
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
१७. पत्नीची निवड जी योजना झालेली आहे, त्यात काहीही बदल होणार नाही! जर लग्न करण्याची योजना झालेली आहे, तर मग आता आपण असे नक्की केले की, मला लग्न करायचे नाही, तर ती अर्थशून्य गोष्ट आहे. त्यात मग तुमचे काहीही चालणार नाही आणि लग्न तर करावेच लागेल.
प्रश्नकर्ता : ह्या जन्मात आपण ज्या भावना केल्या असतील, त्या पुढच्या जन्मात फळतील ना ?
दादाश्री : होय, ह्या जन्मात ज्या भावना केल्या, त्या पुढच्या जन्मात फळणार. परंतु आता मात्र त्यापासून सुटकाच नाही! वर्तमानात त्यात कोणाचेही चालत नाही ना! भगवंत जरी वळवायला गेलेना, की लग्न करू नको, तरी तेथे भगवंताचे सुद्धा चालणार नाही ! मागच्या जन्मात लग्न नाही करायचे अशी योजना केलीच नाही, म्हणून आता बिनलग्नाचा राहणे शक्य होत नाही. जी योजना केली असेल तीच येईल!
जसे शौच केल्याशिवाय कोणाचे नाही चालत, तसेच लग्न केल्याशिवाय सुद्धा चालेल असे नाही! तुझे मन कुमार असेल, तर हरकत नाही. पण जेथे मन विवाहित आहे, तेथे लग्न केल्याशिवाय चालत नाही आणि कोणाच्या सहाया (सोबती) शिवाय माणूस राहू शकत. नाही. सहाऱ्याशिवाय कोण राहू शकतो? तर फक्त 'ज्ञानीपुरूष' एकटेच, जेथे दुसरे कोणीच नसेल तेथे सुद्धा राहू शकतात, कारण की ते स्वतः निरालंब झालेले आहेत, कोणत्याही अवलंबनाची त्यांना गरजच नाही.
माणूस बिचारा सहाऱ्या शिवाय नाहीच जगू शकत. वीस लाख रूपयाचा मोठा बंगला असेल आणि रात्री एकट्याला झोपायला सांगितले तर? त्याला सहारा पाहिजे. मनुष्याला सहारा पाहिजे, म्हणून तर लग्न करतात ना ? विवाह पद्धत काही चुकीची नाही आहे. तो निसर्गचा नियम आहे.
म्हणून लग्न करण्यात सहज प्रयत्न करायचा, मनात भावना ठेवायची की चांगले स्थळ मिळाले की लग्न करायचे आहे, नंतर मग ते स्टेशन आल्यावर उतरून जायचे. स्टेशन येण्यापूर्वीच धावपळ केली तर काय होईल...? तुला त्या अगोदर धावपळ करायची आहे ?