________________
आई - वडील आणि मुलांचा व्यवहार
जे सांगितले तेवढीच नाही, तर खूप खोलवरची गोष्ट आहे ! हे तर सर्व हिशोबाने घेतले जाते आणि दिले जाते !
६७
आत्मा कोणाचा मुलगाही नसतो आणि कोणाचा वडीलही नसतो. आत्मा कोणाची पत्नी होत नाही, किंवा कोणाचा पती होत नाही. हे सर्व ऋणानुबंध आहेत. कर्माच्या उदयाने एकत्र आले आहेत. आता (ह्या जन्मातील) लोकांना तसे भासत आहे. आणि आपल्याला सुद्धा असे भासते, तर हे फक्त भासते एवढेच. वास्तवात तर दिसतच नाही. वास्तवात असते तर कोणी लढलेच नसते. ही तर एका तासातच भानगड होऊन जाते, मतभेद होऊन जातात, तेव्हा लढतात की नाही लढत ? ' माझे-तुझे' करतात की नाही करत ?
प्रश्नकर्ता : करतात.
दादाश्री : अर्थात् फक्त भास्यमान आहे, 'एक्झॅक्ट' (वास्तविक) नाही आहे. कलियुगात आशा ठेऊ नका. कलियुगात आत्माचे कल्याण होईल असे करा, नाहीतर काळ खूप विचित्र येत आहे, पुढे येणारा काळ भयंकर विचित्र येत आहे. अजून येणारी हजारेक वर्षे चांगली आहेत, परंतु त्यानंतर भयानक काळ येणार आहे. नंतर केव्हा संधी मिळेल ? म्हणून
आत्मकल्याण करुन घ्या.
जय सच्चिदानंद