________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
६५
काही मुले आपल्या आई वडीलांची सेवा करत असतात, अशी उत्तम सेवा करतात की खाणे-पिणे सुद्धा विसरून जातात. म्हणजे सर्वांसाठी असे नाही आहे. आपल्याला जे मिळाले ते सर्व आपलाच हिशोब आहे. आपल्या दोषामुळे ते आपल्याला मिळाले. ह्या कलियुगामध्ये आपण का आलोत? सत्युग नव्हते? सत्युगात सगळे सरळ होते. कलियुगात सगळे वाकडे भेटतात. मुलगा चांगला असला तर व्याही वाकडे भेटेल, भांडण-तंटा करत राहणारे, सून भांडकुदळ भेटेल जी भांडतच राहिल. कोणी ना कोणी असे वाकडे भेटतच असतात आणि घरामध्ये भाडण-तंटे चालूच राहतात.
प्रश्नकर्ता : 'वनस्पतित पण प्राण आहे' असे म्हणतात. आंब्याचे झाड आहे, त्या झाडाच्या जेवढ्या कैऱ्या असतील, त्या सर्व कैऱ्यांची चव एक सारखी असते, परंतु माणसांमध्ये पांच मुले असतील तर त्या पाचही मुलांचे विचार-वाणी-वर्तन वेगवेगळे, असे का?
दादाश्री : आंब्यांमध्ये पण वेगवेगळी चव असते, तुमची समजण्याची शक्ति इतकी सूक्ष्म नाही आहे. परंतु प्रत्येक आंब्याची चव वेगवेगळी असते, प्रत्येक पानामध्ये सुद्धा फरक असतो. एकसारखे दिसतात, एकाच प्रकारचा सुगंध असतो, परंतु काही ना काही फरक असतो. कारण ह्या जगाचा नियम आहे की, 'स्पेस' (जागा) बदलल्यास फरक होतोच!
प्रश्नकर्ता : सर्वसाधारणपणे म्हणतात ना की ही सर्व कुटुंबे वंश परंपरेने एकत्र येत असतात.
दादाश्री : होय, ते सर्व तर आपल्या ओळखीचेच. आपलेच वर्तुळ, सर्व सोबत राहणार. समान गुणवाले आहेत, म्हणून राग-द्वेषाच्या कारणाने तिथे जन्म घेतात आणि राग-द्वेषाचा हिशोब फेडण्यासाठी एकत्र येतात. डोळ्यांनी असे दिसते ते तर भ्रांतीमुळे दिसते परंतु ज्ञानदृष्टिने तसे नाही आहे.
प्रश्नकर्ता : दादाजी, हा जो जन्म घेणारा आहे, तो आपल्या कर्माने जन्म घेतो ना ?
दादाश्री : नक्कीच. तो गोरा आहे अथवा काळा आहे, ठेंगणा आहे