________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
अथवा उंच आहे, हे सर्व त्याच्या कर्माने आहे. हे तर लोकांनी ह्या डोळ्यांनी पाहिले व जुळवून घेतले की, मुलाचे नाक तर एकदम तसेच्या तसे दिसत असते, म्हणून वडीलांचेच गुण मुलामध्ये उतरले आहेत, असे म्हणतात! अर्थात् वडील जगात कृष्ण भगवान झालेत, म्हणजे काय त्याचा मुलगाही कृष्ण भगवान झाला? असे तर कित्येक कृष्ण भगवान होऊन गेलेत. सर्व प्रकट पुरुष कृष्ण भगवानच म्हटले जातात. परंतु त्यांचा एक तरी मुलगा कृष्ण भगवान झाला? अर्थात ह्या सर्व वायफळ गोष्टी आहेत!
जर वडीलांचे गुण मुलामध्ये येत असतील तर मग सर्व मुलांमध्ये ते सारखेच येतील. हे तर वडीलांच्या मागच्या जन्मातले जे ओळखीचे आहे, फक्त त्यांचेच गुण जुळत असतात. तुमच्या ओळखीचे सर्व कसे असणार? जे तुमच्या बुद्धीशी जुळते, तुमच्या हेतूशी जुळते असेच. तर ज्यांचे गुण तुमच्याशी जुळत असेल, ते ह्या जन्मात पुन्हा मुलं होऊन जन्माला येतात. कारण त्यांचे गुण तुमच्याशी जुळतात, परंतु वास्तवात ते त्यांचे स्वत:चेच गुण धारण करत असतात. सायंटिस्ट (वैज्ञानिक)यांना असे वाटत असते की हे गुण परमाणुमधून येत असतात परंतु ते तर आपले स्वत:चेच गुण धारण करीत असतात. मग कोणी वाईट, नालायक असेल तर कोणी दारूड्या पण निपजत असतो. कारण की जसे जसे संयोग त्याने एकत्र केले आहेत, तसेच तेथे घडत असते. काहींना वारसाहक्काने काहीच मिळत नाही. म्हणजे वारसाहक्क हा फक्त दिखावा आहे. परंतु वास्तावात पूर्वजन्मामध्ये जे त्याचे ओळखीचे होते, तेच आले आहेत.
प्रश्नकर्ता : म्हणजे जो हिशोब फेडायचा आहे, ऋणानुबंध फेडायचे आहे ते फेडल्यावर हिशोब पूर्ण होतो?
दादाश्री : होय, ते सर्व फेडले जातात. म्हणून मला येथे हे विज्ञान खुले करुन सांगावे लागले की, अरे, त्यात वडीलांचा काय गुन्हा आहे ? तू क्रोधी, तुझे वडील क्रोधी, परंतु हा तुझा भाऊ शांत का आहे? जर तुझ्यामध्ये तुझ्या वडीलांचे गुण आले असतील तर तुझा हा भाऊ शांत का आहे? हे सर्व समजत नाही, म्हणून लोक विनाकारण काहीही सांगत असतात आणि जे बाहेरून दिसेल, त्याला सत्य मानतात. ही गोष्ट बरोबर समजून घेण्यासारखी आहे अतिशय खोलवरची गोष्ट आहे ही. हे तर मी